निपुण भारत अभियान अंतर्गत निर्धारित करण्यात आलेले सुधारित लक्ष्य (Revised Lakshyas) In alignment with NCF-FS अवगत करणेबाबत शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ :
१. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०
२. निपुण भारत अभियान भारत सरकारच्या National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy (NIPUN BHARAT) अंतर्गत मार्गदर्शन सूचना. ३. निपुण भारत अभियान अंमलबजावणीबाबत शासन निर्णय / २०२१-संकीर्ण- प्रएस/१७९.क्र.डी- ६२७-दिनांक. ऑक्टोबर २०२१.
४. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मभावि/निभाज/२०२२/५१४६ दि.३१.१०.२०२२
५. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर २०२२
६. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२३
७. राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर २०२३
८. शिक्षा मंत्रालय भारत सरकार यांचे दि. २०/०८/२०२४ रोजीचे पत्र.
९. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे दि.६/०९/२०२४ रोजीचे पत्र.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार तसेच निपुण भारत अभियान मार्गदर्शक सूचनेनुसार विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित होण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावरून विविध उपक्रमांचे
नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी संदर्भ क्र. ३ नुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यापूर्वी यानुसार निपुण भारत अभियानाचे उद्दिष्ट बालवाटिका ते इयत्ता तिसरीपर्यंतच्या (३) ते ९ वर्ष वयोगट) सर्व विद्यार्थ्यांनी सन २०२६-२७ अखेर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करणे हे होते. सदर वयोगटानुसार इयत्तानिहाय लक्ष्य निर्धारित करण्यात आलेले होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षणाच्या स्तरांची पुनर्रचना करण्यात आली. या धोरणात सुचविल्यानुसार ५+३+३+४ या नवीन संरचनेचा स्वीकार करण्यात आला आहे. यानुसार, पायाभूत स्तर - बालवाटिका ते इयत्ता दुसरी पर्यंत असून पूर्वतयारी स्तर इयत्ता तिसरी ते पाचवी असा आहे.
यानुसार राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर २०२२, व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२३ ची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच राज्य स्तरावर उपरोक्त संरचनेनुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा-पायाभूत स्तर व शालेय शिक्षण यांची निर्मिती करण्यात आली आहे. याकरिता, उपरोक्त सुधारित संरचना व निपुण भारत अभियान याचेशी संबंधित वयोगट यामध्ये एकवाक्यता असण्यासाठी संदर्भ क्र. नुसार शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांनी उपरोक्त बदललेल्या संरचनेनुसार निपुण भारत अभियान अंतर्गत समाविष्ट वयोगट व लक्ष्य यामध्ये केलेली सुधारणा सर्व संबंधित घटकांना अवगत करण्याबाबत कळविले आहे.
निपुण भारत अभियानाचे सुधारित उद्दिष्ट व वयोगट
✓ निपुण भारत अभियानामध्ये वर्ष ३ ते ८ वयोगट (पहिले तीन वर्ष बालवाटिका, इयत्ता पहिली व दुसरी) समाविष्ट असेल. ✓ निपुण भारत अभियान उद्दिष्ट ३ ते ८ वयोगट (पहिले तीन वर्ष बालवाटिका व इयत्ता पहिली व दुसरी) मधील सर्व विद्यार्थ्यांनी सन २०२६-२७ अखेर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विषयक लक्ष्य प्राप्त करणे.
निपुण भारत अभियानाचे सुधारित लक्ष्य (Revised Lakshyas aligned with NCF - FS)
पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान साठी लक्ष्ये/ध्येये
1 मित्र आणि शिक्षकांसोबत बोलतो.
2 बालवाटीका किंवा वयोगट ५-६ वर्षे
मौखिक भाषा
बडबडगीते /कविता आकलनासह म्हणतो.
वाचन
कुतुहलाने पुस्तक पाहतो आणि चिवाच्या महाय्याने गोष्ट वाचण्याचा प्रयत्र करतो.
काही परिचयाचे सतत दृष्टीक्षेपात येणारे / यमक जुळणारे शब्द (Sight words. डवे/खाऊची वेष्टने यावरील शब्द) याकडे लक्ष वेधण्यास सुरुवात करतो.
अक्षरे आणि संबंधित ध्वनी ओळखतो.
कमीत कमी २-३ अक्षरापासून तयार केलेले शब्द वाचती
स्व-अभिव्यक्तीसाठी गिरगिटतो / रेषोठ्या मारतो/चित्र काढतो व रंगवतो.
लेखन
ओळखण्यायोग्य अक्षरे लिहिण्यास सुरवात करतो.
पेन्सिलचा वापर करतो आणि ओळखण्यायोग्य अक्षरे लिहिण्यासाठी पेन्सिल योग्य प्रकारे धरतो
स्वतःचे नाव ओळखती/लिहितो.
वस्तूंची गणना करती आणि ९ पर्यंतच्या संख्याचिन्हाशी (Numerals) जोडी लावतो.
९ पर्यंतचे अंक ओळखतो, वाचतो आणि लिहितो.
संख्याज्ञान
साधे आकृतिबंध ओळखतो, पुनरावृत्ती करतो / रेखाटतो.
दोन गटातील वस्तूंची त्यांच्या संख्येनुसार तुलना करतो. याकरिता च्या पेक्षा जास्त / कमी/समान इत्यादी शब्द वापरतो,
संख्या वस्तू/आकार/पटना यांची क्रमवार मांडणी करतो.
निरीक्षणक्षम वैशिष्ट्यांच्या आधारे वस्तूंचे वर्गीकरण करतो आणि वर्गीकरण निकषांविषयी चर्चा करतो.
त्याच्या/तिच्या सभोवतालच्या विविध वस्तूंच्या संदर्भात तुलनात्मक शब्द वापरतो उदा. लांब- सर्वांत लांब, उंच सर्वांत उंच, आखूड सर्वात आखूड पेक्षा जड/पेक्षा हलका इत्यादी
मौखिक
भाषा
बाचन
इयत्ता पहिली / वयोगट ६-७ वर्षे
परिचित व्यक्ती, भोवतालचा परिसर, गरजा याबद्दल मित्र व वर्गशिक्षकाना प्रत्र विचारतो व संभाषण करतो. शालेय परिसर / बातावरण व वर्गातील मजकूर समृद्ध वातावरण याबद्दल बोलतो.
३. बडबडगीते/कविता/गाणी साभिनय म्हणतो.
१. प्रकट वाचन /कथाकथनात सक्रीय सहभाग घेतो, कथाकथना दरम्यान आणि नंतरच्या प्रश्नांना प्रतिसाद देतो, आवश्यक साहित्य / कठपुतळ्यांच्या सहाय्याने परिचित कथा, माहित्य इत्यादींचे सादरीकरण करतो
२. नवीन शब्दांचे वाचन करण्यासाठी ध्वनी आणि चिन्हे / प्रतीके यांचा वापर करतो.
३. वयानुरूप अपरिचित मजकुरातील ४-५ सोप्या शब्दांनी तयार झालेली महान वाक्ये वाचतो
१. परिचित संदभनि येणाऱ्या शब्दांतील मात्रा ओळखतो. (कथा, कविता, परिसरातील लेखन छापील मजकूर इत्यादी)
संख्याज्ञान
२. कार्यस्तिका, शुभेच्या पत्रे, वस्तूंची वा व्यक्तींची ओळखण्याजोगी चित्रे काढतो तसेच त्यातून सुयोग्य असा प्रतीत होणारा अर्थ दर्शविण्यासाठी लेखन करतो.
१. वस्तू मोजतो व २० पर्यंत संख्याबोध (Number Sense) विकसित करतो.
२. परिसरातील, आकारांचे आणि संख्यांचे सोपे आकृतिबंध ओळखतो आणि विस्तार करतो.
दैनंदिन जीवनात ९ पर्यंतच्या संख्यांच्या बेरीज आणि वजाबाकीचा (२० पर्यंत उत्तर येईल ) उपयोग करतो ४. त्याच्या/तिच्या सभोवतालच्या त्रिमितीय आकारांच्या (घनाकृती आकार) भौतिक गुणधर्माचे निरीक्षण आणि वर्णन करतो उदा वक्राकार / सपाट पृष्ठभाग, कोपरे आणि फडांची संख्या इ.
अप्रमाणित / असमान एककांच्या सहाय्याने लांबीचा अंदाज व पडताळा घेती उदा बीत, पाऊल बोटे इत्यादी. तसेच, अप्रमाणित / असमान एककांच्या सहाय्याने धारकतेबाबत अंदाज व पडताळा घेती. उदा. कप चमचा, मग इत्यादी. भारतीय चलनातील २० पर्यंतच्या नाणी व नोटा ओळखती.
इयत्ता दुसरी किंवा वयोगट ७-८ वर्षे वर्गात उपलब्ध असलेल्या मुद्रित साहित्याबद्दल बोलतो. प्रश्न विचारण्यासाठी संभाषणात व्यस्त राहतो व इतरांचे ऐकतो.
कविता/गाणी म्हणतो.
कया/कविता /मुद्रित साहित्यामध्ये येणात्वा परिचित शब्दांची पुनरावृत्ती करतो.
बालसाहित्य/पुस्तकातील कथांचे वर्णन करतो तसेच इतरांना सांगतो. दिलेल्या शब्दातील अक्षरे वापरून नवीन शब्द तयार करती.
वयानुरूप सोप्या शब्दांनी बनलेल्या ६ ते ८ वाक्यांचा अपरिचित मजकूर योग्य वेगाने,
अचूकतेने, आकलनासंह वाचतो स्वतः व्यक्त होण्यासाठी लहान / सोपी वाक्ये अचूकपणे लिहितो.
सोपी ४ ते ५ अशी सुवाच्य वाक्ये लिहितो.
वस्तू मोजतो व ९९ पर्यंत संख्याबोध (Number Sense) विकसित करतो.
विविध आकार व संख्या यापासून नवीन आकृतिबंध तयार करतो.
दैनंदिन जीवनात ९९ पेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा बेरीज व वजाबाकी या क्रियांचा वापर करतो. गुणाकार हा बेरजेची पुनरावृत्ती व भागाकार हा समान वाटप अथवा हिस्सा म्हणून करतो तसेच गुणाकार तथ्ये (Multiplication facts) समजून घेतो (२,३ आणि ४ चे पाडे)
Oral Language
Reading मदतीने)
आयत त्रिकोण, वर्तुळ, संववर्तुळ सारखे द्विमितीय आकार ओळखती व वर्णन करतो.
अप्रमाणित/असमान एकके वापरून लांबी, अंतर, धारकता यांचा अंदाज घेती व मोजतो उदा काठी, पेन्सील, धागा, पेला, चमचा, मग इत्यादी माधा तराजू वापरून वजनाची तुलना करतो.
जवळ दूर आत्त/बाहेर, च्या वरच्या खाली डावीकडे उजवीकडे, पुढे मागे वर खाली या अवकाशीय संबंध दर्शविणाऱ्या शब्दांचा वापर करतो.
100 रु. पर्यंतची रक्कम वापरून साधे व्यवहार करतो.
REVISED LAKSHYA (In alignment with NCF-FS) Balvatika Or Age 5-6
Talks to friends and teachers.
Recites rhymes/ poems with understanding
Looks at books and attempts reading the story with the help of pictures.
Begins to point out and recognize some familiar repeated/rhyming words ( sight words or words on containers/ food wrappers)
Recognizes letters and corresponding sounds
Reads simple words compromising of at least 2-3 alphabets.
Scribbles/draws and paints for self expression.
Begins to form recognizable letters,
Uses a pencil and holds it properly to form recognizable letters.
Recognizes and writes his her own name
Counts objects and correlates numerals up to 9.
Recognizes, reads and writes numerals up to 9.
Identifies and copies/draws simple patterns.
Compares two groups in terms of mumber of objects and uses words like more than/less than /equal to etc.
Arranges numbers/objects/shapes /occurrence of events in a sequence.
Writing
Numeracy 3
Classifies objects based on their observable characteristics and communicates the criteria of classification. Uses vocabulary for comparative words like longer, longest, taller, tallest, shorter, shortest, heavier than, lighter than ete. in the context of different objects around him/her.
Oral Language
Grade-1 or age 6-7
Converses and asks questions with friends and class teacher about her/his needs, familiar persons and surroundings.
Talks about print available in the classroom, school premises and surroundings Recites rhymes/poems/songs with action.
Reading
Participates during read aloud/story telling session in an active way and answers questions during and after story session, acts out familiar story with props and puppets,
Uses sound symbol correspondence to read new words.
Reads small sentences consisting of at least 4-5 simple words in an age appropriate unknown text.
Develops familiarity with Matras in words occurring in familiar contexts. (Story/poems/ environment print etc.) Writes draws and/or makes things to convey meaning and represent
Writing
names on her/his worksheet, greeting messages, draws pictures that are recognizable objects/people. Uses sound symbol correspondence to write words with invented
spellings.
Writes 2-3 sentences with understanding
Counts objects and develops number sense up to 20.
Numeracy
Identifies and extends simple patterns in their surroundings, shapes and numbers Using addition and subtraction of numbers up to 9 (sum not exceeding 20) in daily life situations. Observes and describes physical properties of three-dimensional shapes (solids) around him/her like round/flat surfaces, number of corners and edges etc. Estimates and verifies length using non-standard non uniform units like hand span,footstep fingers etc and capacity using non-standard uniform units like cup, spoon, mug etc.
Oral Language
Identifies Indian currency notes and coins up to INR 20.
Grade 2 or age 7-8
Converses and talks about print available in the classroom.
Engages in conversation to ask questions and listens to others.
Recites songs/poems
Repeats familiar words occurring in stories/poems/print etc.
Reads and narrates /re-tells stories from children's literature/textbook
Reading
Creates meaningful new words from the letters of a given word.
Reads age appropriate unknown text of 6-8 sentences with simple words with comprehension, clarity and fluency.
Writing
Writes short/simple sentences to express their understanding and expressions.
Writes 4 to 5 short sentences with legible writing.
Counts objects and develops number sense up to 99.
Create new patterns from different shapes and numbers.
Numeracy
Uses addition and subtraction of numbers up to 99 sum not exceeding 99 in daily life situations.
Performs multiplication as repeated addition and division as equal distribution/ sharing and construes multiplication facts (tables of 2. 3 and 4.) Identifies and describes 2 D shapes like rectangle, triangle, circle, oval etc.
Estimates and measures length/distance/capacity using non-standard uniform units like rod, pencil, thread, cup, spoon, mug etc. and compares weight using simple balance.
Uses spatial vocabulary like far/near, in/out, above/below, left/right, front/ behind, top/bottom etc.
Performs simple transactions using money up to INR 100.
उपरोक्त सुधारित लक्ष्यबावत संदर्भ क.८ मधील मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे आहेत त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रात तात्काळ कार्यवाही होईल याची दक्षता घ्यावी.
सूचना -
१. आपल्या कार्यक्षेत्रातील अभियानाशी संबंधित सर्व घटक जसे, क्षेत्रीय अधिकारी, शैक्षणिक संस्था, शाळा, शिक्षक, पालक व विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, स्थानिक संस्था प्रतिनिधी यांना इयत्तानिहाय सुधारित लक्ष्यबाबत अवगत करावे. याकरिता सर्व आवश्यक माध्यमांचा वापर करावा जेणेकरून सर्वांपर्यंत सदर योग्य माहिती वेळेत पोहोचेल,
२. प्रत्येक शाळा व संबंधित संस्था मध्ये निपुण भारत अभियान प्रतिज्ञा पोस्टर / भित्तीपत्रक प्रदर्शित करावे. ३. प्रत्येक शाळा व संबंधित संस्था मध्ये निपुण भारत अभियान सुधारित इयत्ता वयोगटनिहाय लक्ष्य यांचे पोस्टर/भित्ती पत्रक प्रदर्शित करावे,
४. निपुण भारत अभियान अंतर्गत प्रत्येक वर्गात निपुण भारत अभियानाची ध्येये व संबंधित अध्ययन निष्पत्ती प्रिंट स्वरुपात (हार्ड कॉपी) उपलब्ध असावेत, सदर संदर्भीय ध्येये व संबंधित अध्ययन निष्पत्ती राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर २०२३ मध्ये परिशिष्ट मध्ये देण्यात आल्या आहेत, त्यांचे अवलोकन करावे. (सदर आराखडा परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.) निपुण भारत अभियान जिल्हास्तरीय अंमलबजावणी आढावा कार्यशाळा अभियानचे उद्दिष्ट व लक्ष्य सन २०२६-२७ पर्यंत प्रास होण्याच्या दृष्टीने आपल्या जिल्ह्यातील निपुण भारत अभियान प्रभावी विषयक होणारी अंमलबजावणी, पुढील नियोजन, Best Practices, येणाऱ्या अडचणी याविषयक कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे. तारीख च वेळ मेल द्वारे यथावकाश कळविण्यात येईल. उपरोक्त नुसार माहिती संबंधित सर्वांपर्यंत तात्काळ पोहोचवावी, तसेच निपुण भारत अभियानचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीने आवश्यक कालबद्ध आराखडा तयार करावा व उपरोक्त नुसार केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालायास तात्काळ सादर करावा. सोबत निपुण प्रतिज्ञा
प्रत माहितीस्तव सविनय सादरः
१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई. २) मा.आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
३) मा.आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना, बेलापूर, मुंबई ४) मा.राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई. ५) मा. जिल्हाधिकारी, सर्व जिल्हे
६) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) प्रत माहितीस्तव व योग्य कार्यवाहीस्तव सादर
शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय,पणे
25/10/25
(राहुल रेखावार भा.प्र.से)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
वरील परिपत्रक संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
NIPUN भारत अभियान
NIPUN BHARAT चा Full Form ...NationaI Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy
म्हणजेच बालकांमध्ये मुलभूत वाचन , समज आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करणे.
मुलांना साक्षर बनवणे. मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान हेच निपुण भारत मिशन कार्यक्रमाचे लक्ष आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE Act 2009) लागू झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अधिक लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाची हमी RTE Act 2009 प्रमाणे समाजातील सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांना मिळत आहे. यामध्ये सर्व बालकांचा समावेश करण्यात आला आहे. भविष्यातील देशाची प्रगती ही आज ज्या पध्दतीचे शिक्षण आपण मुलांना देतो त्यावर उद्याचे भविष्य अवलंबून असते. नुकतेच केंद्र शासनाने NEP 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जाहीर केले. आणि शिक्षण क्षेत्रातील एक महत्वाचा बदल आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत दिसून येणार आहे. याच धर्तीवर केंद्र शासनाच्या शिक्षा मंत्रालयाने निपुण भारत मिशन कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने 23 ऑक्टोबर 2020 च्या शासन निर्णयानुसार निपुण भारत अभियान सुरू झाले आहे.
निपुण भारत मिशन प्रोग्राम अंतर्गत FLN वर लक्ष केंद्रित केले गेले आहे.
FLN म्हणजे काय तर मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान म्हणजेच FLN होय.
FLN चा Full Form -Foundational Literacy And Numeracy असा आहे.
तर याचा मराठीत अर्थ मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान असा आहे.
मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान कार्यक्रमाची गरज का निर्माण झाली?
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा सन २०१५ मधील कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्यात आला. त्यांतर्गत प्रत्येक मुलाने मुलभूत अध्ययन क्षमता प्राप्त करणे. कोणतेही मूल अभ्यासात मागे न राहणे हे मुख्य ध्येय सदर कार्यक्रमाचे होते.
सन २०१४, २०१६ व २०१८ च्या ASER अहवालानुसार या कार्यक्रमास प्रचंड यश मिळाले. तथापि, कोव्हीड १९ च्या महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला. त्यामध्ये युनेस्कोने केलेल्या अभ्यासानुसार शालेय शिक्षणाचा विद्यार्थ्यांचा ६५ ते ७४% वेळ वाया गेल्याचे दिसून आले.
अझिम प्रेमजी विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणातून केवळ ४२% मुले, ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहू शकली नाही. ऑनलाईन वर्गात देखील मुलांना शिक्षण परिणामकारक मिळाल्याचे दिसून आले नाही.
जवळपास ८०% पेक्षा अधिक शिक्षकांना ऑनलाईन विद्यार्थ्यांबारोबर भावनात्मक संपर्क ठेवणे कठीण गेले ९०% पेक्षा अधिक शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन परिणामकारकरित्या करणे अशक्य झाले.
अशियन विकास बँक २०२१ नुसार शाळा बंद राहिल्यामुळे ५ अशियन देशामधील मुलांच्या भावी सरासरी कमाईच्या ३.५% ते ४.७% नुकसान झाले. म्हणून सध्याची परिस्थिती लक्षात घेता मुलांना पायाभूत शिक्षण मिळणे गरजेचे आहे. *नविन प्रवेशित आणि प्राथमिक स्तरावरील मुलांच्या मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी तसेच नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी निपुण भारत अंतर्गत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान
Foundational Literacy And Numeracy
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये, प्राथमिक स्तरावर सन २०२६-२७ पर्यंत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. युनेस्को च्या अहवालानुसार अद्यापही बहुतेक प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांनी मुलभुत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केलेले नाही. असे सर्वेक्षणात दिसून आले आहे. यासाठी मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
वय वर्षे ३ ते ९ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी त्वरीत एक राष्ट्रीय अभियान राबवून राज्यामध्ये अंगलबजावणी करणे आवश्यक होते. ही गरज लक्षात घेता मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान (Foundational Literacy And Numeracy) निपुण भारत मिशन सुरु करण्यात आले आहे.
NIPUN/FLN कार्यक्रमामध्ये पायाभूत साक्षरतेचे घटक भाषा व गणित यावर लक्ष असून निपुण भारत मिशन मुलभूत साक्षरता अभियान FLN हे पायाभूत साक्षरता शिक्षणाशी संबंधित आहे.
*पायाभूत साक्षरतेचे घटक*
१) मौखिक भाषा विकास
लेखन व वाचनाची कौशल्ये विकसित करण्यासाठी मौखिक भाषेचा विकास महत्त्वाचा आहे.
२) उच्चार शास्त्राची जाणीव
शब्दांची लय व ध्वनीची जाणीव या बाबींचा योग्य वापर होणे गरेजेचे आहे.
३) सांकेतिक भाषा/लिपी समजून घेणे
यामध्ये छापील मजकूरांचे आकलन करण्याची क्षमता, अक्षरांचे ज्ञान, सांकेतिक भाषा, लिपी समजून घेणे, शब्द ओळखणे.
४) शब्द संग्रह
मौखिक शब्द संग्रह, वाचन/लेखन शब्दसंग्रह व शब्दांच्या विविध अर्थछटा.
५) वाचन व आकलन
मजकूराचे वाचन करून अर्थ समजून घेणे, माहिती प्राप्त करणे व मजकूराचे स्पष्टीकरण करणे.
६) वाचनातील ओघवतेपणा
मजकूर अचूकपणे व लयबद्ध वाचणे, अभिव्यक्ती व आकलन.
७) लेखन
अक्षरे व शब्द लिहिणे, अभिव्यक्तीसाठी लिहिणे याची क्षमता.
८) आकलन
छापील मजकूर/पुस्तके यामुळे आकलन कौशल्ये विकसित होण्यास मदत.
९) वाचन संस्कृती/वाचनाकडे कल
यामध्ये विविध तऱ्हेची पुस्तके व इतर वाचन साहित्य वाचण्याकडे कल असणे.
पायाभूत संख्या साक्षरता, संख्याज्ञान व गणितीय कौशल्ये
पायाभूत संख्या साक्षरता म्हणजे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी साध्या संख्यात्मक कल्पनांचा वापर करण्याची क्षमता.
संख्या पूर्व व संख्या कल्पनेचा विकास, तुलना करण्याचे ज्ञान व कौशल्य, क्रमश: मांडणी करणे, आकृतीबंध/संरचना ओळखणे व त्याचे वर्गीकरण. या बाबी प्राथमिक वर्गात गणित अध्ययनाचा पाया घालतात.
प्रारंभिक गणिताचे दृष्टीकोन
संख्या पूर्व :- गणन व संख्या ज्ञान
संख्या व संख्येवरील क्रिया :- दशमान पध्दतीचा वापर, संख्येवरील क्रियांवर प्रभुत्व संपादन करणे.
गणना करणे:- तीन अंकी संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणितीय क्रिया करण्याच्या पद्धती समजावून घेणे व त्याचा उपयोग करणे.
आकार व अवकाश याबाबत समजून घेणे:- तीन अंकी संख्यांपर्यंतची सोपी आकडेमोड करुन त्यांच्या विविध संदर्भातील दैनंदिन कार्यात उपयोग करणे.
नमुना/संरचना:- आकार व अवकाशातील वस्तू समजून घेण्यासाठी संबंधित शब्द संग्रह शिकणे.
निपुण भारत अभियानाचा मुख्य उद्देश ध्येय कोणते आहे?
निपुण भारत मिशन अंतर्गत मुलभूत साक्षरता अभियान FLN चे Goal , Nipun Bharat Mission Aim खालीलप्रमाणे आहेत.
निपुण भारत अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता ३ री पर्यंत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करणे.
केंद्र पुरस्कृत ‘समग्र शिक्षा’ अंतर्गत मुलांना शालेय शिक्षणामध्ये प्रवेश देणे व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे.
शिक्षक प्रशिक्षण, अध्ययन-अध्यापन संदर्भ ई-साहित्य विकसित करणे.
वय वर्ष ३ ते ९ वयोगटातील विद्यार्थ्यांचे मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य आत्मसात करणे.
प्राथमिक स्तरावरील सन २०२६-२७ पर्यत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करणे.
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे.
राज्यात सन २०२६-२७ पर्यंत इयत्ता ३ री पर्यंतच्या १००% विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी तसेच इयत्ता ३ री पुढे गेलेल्या तथापि, अपेक्षित क्षमता प्राप्त न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘निपुण भारत’ अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी करण्यास शासनाने शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, निपुण भारत शासन निर्णय दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ रोजी ‘निपुण भारत’ अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments