महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये तब्बल 31472 प्राथमिक शिक्षकांच्या जागा रिक्त.
महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाला श्री प्रदीप माधवराव दराडे यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मागवली असता महाराष्ट्रातील प्राथमिक उच्च प्राथमिक शिक्षकांची कटक मंडळ महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका स्वयंअर्थसाहित इत्यादी शासकीय व्यवस्थापनांमध्ये आज रोजी पर्यंतची एकूण रिक्त जगाचा तपशील सदर कार्यालयास उपलब्ध असलेल्या माहिती नुसार त्यांना देण्यात आलेला आहे.
श्री प्रदीप माधवराव दराडे यांना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या पत्रात महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषद शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांचे 219428 एवढी पदे मंजूर आहेत त्यापैकी 199976 एवढी पदे कार्यरत आहेत तर जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण 19452 पदे रिक्त आहेत.
महानगरपालिकांच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची एकूण 19 हजार 960 पदे मंजूर असून त्यापैकी 8862 पदे कार्यरत आहे व 11,098 एवढी पदे रिक्त आहेत.
नगरपरिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची सहा हजार 37 पदे मंजूर असून त्यापैकी 5136 पदे कार्यरत आहेत व 901 पदे रिक्त आहेत.
छावणी शाळांमध्ये 166 पदे मंजूर असून त्यापैकी 145 पदे कार्यरत आहेत व 21 पदे रिक्त आहेत.
महाराष्ट्रात एकूण सर्व सरकारी शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची दोन लक्ष 45 हजार 591 पदे मंजूर असून त्यापैकी दोन लक्ष 14,119 पदे कार्यरत आहेत व 31,472 पदे रिक्त आहेत.
असे सदर पत्रामध्ये नमूद आहे.
वरील प्राथमिक शिक्षण संचालनाची पत्र आपण पीडीएफ स्वरूपात देखील डाऊनलोड करू शकतात त्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments