शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांची आणि किशोरवयीन मुलांची सुरक्षितता आणि हक्क समस्या यावर जनजागृती पर कार्यक्रम आयोजित करणे बाबत एमएससीईआरटी चे पत्र

 शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांची आणि किशोरवयीन मुलांची सुरक्षितता आणि हक्क समस्या यावर जनजागृती पर कार्यक्रम आयोजित करणे बाबत एमएससीईआरटी चे पत्र. 


नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये मुलांच्या सुरक्षितते संदर्भात अनेक मुद्दे मांडले आहेत. यासाठी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांची आणि किशोरवयीन मुलांची सुरक्षितता आणि हक्क समस्या याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मदत पदार्थाची सेवन हिंसाचार भेदभाव आणि छळवणुकीचे प्रकार थांबून किशोरवयीन मुलांना सुरक्षित वातावरण देणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्या हक्काची जपणूक होणे आवश्यक आहे. 

अमली पदार्थ संबंधी विविध मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली येथे मान्य केंद्रीय गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय नार्को समितीची बैठक झाली सदर बैठकीत अमली पदार्थाच्या तस्करी आणि गैरवर्तनाच्या दुष्परिणामाबद्दल जागृक्ता वाढविणे भारतातील अमली पदार्थाच्या विरोधात लढण्यासाठी की सर्व मुलांना प्रेरित करण्यासाठी प्रभावी पावले उचलली जाण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. 

भारतातील किशोरवयीन मुलांना सुदृढ आणि जबाबदार जीवन जगण्यासाठी शाळांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी शिक्षण विभागाने तदनुषंगाने खाली सुचवलेले कार्यक्रम शालेय स्तरावर आयोजित केली जावीत या संदर्भात पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा. 

१) दरमहा निबंध लेखन स्पर्धा रेखाचित्र चित्र छायाचित्रण आणि शाळांमध्ये प्रदर्शन फलक अशा संकल्पनेसह कला स्पर्धांचे आयोजन करावे. 

२) स्थानिक कायद्यांची अंमलबजावणी करणाऱ्या खाजगी व शासकीय संस्थेच्या समन्वयाने शालेय स्तरावर पथनाट्याचे आयोजन करावे तसेच व्यसनमुक्ती या विषयावर मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित करावे. 

३) अमली पदार्थ विरोधी मोहिमे संदर्भात विविध घोषवाक्य स्पर्धाचे शाळांमध्ये आयोजन तसेच समाज माध्यमाचा वापर करून व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम जनजागृती करणे यासारखे कार्यक्रम शालेय स्तरावर आयोजित केले जावे. 

वरील कार्यक्रमाव्यतिरिक्त शाळा आपल्या स्तरावर आवश्यकतेनुसार विविध कार्यक्रमाची आखणी करू शकतात. सर्व जिल्ह्यातील प्राचार्य शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी आपल्या अधिनिस्त असणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांना उपरोक्त प्रमाणे विविध कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत अवगत करावे अशा सूचना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालिका डॉक्टर नेहा बेलसरे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक सर्व, शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई सर्व, प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका सर्व यांना दिल्या आहेत. 




वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.