हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत कार्यक्रमांची छायाचित्रे संकेतस्थळावर अपलोड करणे बाबत परिपत्रक व सविस्तर मार्गदर्शन.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण मंत्री क्रीडा विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे च्या दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमाच्या अंमलबजावणी बाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबवण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिलेले आहेत त्यानुसार दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय निमशासकीय खाजगीय स्थापना सहकारी संस्था यांच्या कार्यालयावर ध्वजाची उभारणी करण्याबाबतचा उपक्रम यशस्वीपणे राबवायचा आहे. त्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दिनांक 20 जून 2022 च्या परिपत्रकाद्वारे सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आले आहेत.
हर घर तिरंगा व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत 11 ऑगस्ट 2022 रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रभात फेरी काढण्यात यावी प्रभात फेरीमध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात यावे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयांनी हरभर तिरंगा या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची स्पष्ट छायाचित्रे सांस्कृतिक कार्य विभागाच्या
या वरील संकेतस्थळावर शालेय शिक्षण विभागाला दिलेल्या
Login Id - GD1032
password - GDS##67
वरील युजर आयडी व पासवर्ड वापरून अपलोड करावे.
प्रभात फेरी अमृत महोत्सवाच्या अंमलबजावणीसाठी लागणारे साहित्य उदाहरणार्थ पोस्टर्स बॅनर्स जिंगल्स ही पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्याचा वापर करावा.
जिल्हा निहाय हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची स्पष्ट फोटोग्राफ चित्रफीत व्हिडिओ पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या संकेतस्थळावर शालेय शिक्षण विभागाला दिलेल्या उपरोक्त पासवर्डचा उपयोग करून अपलोड करावे.
सबत्या अनुषंगाने शासनाच्या संदर्भीय पत्रांवर देण्यात आलेल्या सूचनानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आणि हा उपक्रम करण्यात बाबत आपल्या अधिनियस असणाऱ्या सर्व क्षेत्रीय अधिकारी सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना आपल्या स्तरावरून सुचित करावे असे निर्देश डॉ. नेहा बेलसरे, उपसंचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक पश्चिम/दक्षिण/उत्तर मुंबई, प्रशासन अधिकारी महानगरपालिका सर्व, यांना दिले आहेत.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments