एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षण प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थित राहणे बाबत एम एस सी ई आर टी च्या सहसंचालकांचे पत्र व युट्युब लिंक.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या संस्थेने एकात्मिक व व द्विभाषी पाठ्यपुस्तक शिक्षण प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थित राहणे बाबत दिनांक 2022 रोजी पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे.
शैक्षणिक वर्ष 2022 23 करता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती मार्फत इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी तसेच 488 आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गासाठी एकात्मिक द्विभाषी पाठ्यपुस्तकात ची निर्मिती करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शासकीय व शासकीय अनुदानित मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता पहिली वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना तसेच 288 आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना एकात्मिक व द्विभाषी पाठ्यपुस्तकावर आधारित ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत दिनांक पाच ऑगस्ट ते 6 ऑगस्ट 2022 रोजी सोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात आले आहे.
तरी सदर प्रशिक्षण वर्गासाठी आपल्या जिल्ह्यातील मराठी व उर्दू माध्यमांच्या शासकीय व शासकीय अनुदानित सर्व शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना तसेच 488 आदर्श शाळांमधील इयत्ता दुसऱ्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना मराठी माध्यम फक्त आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतील कार्यरत आदर्श शाळा संपर्क अधिकाऱ्यांना उपरोक्त नमूद कालावधीत उपस्थित राहण्यासाठी अवगत करण्यात यावे सदर ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण तपशील व युट्युब लिंक खालील प्रमाणे.
इयत्ता पहिली मराठी माध्यम शुक्रवार दिनांक 5 ऑगस्ट 2022 सकाळी दहा ते 12:50 या वेळेत प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी
या लिंक वर क्लिक करा.
शनिवार दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी दहा ते तीन इयत्ता पहिली मराठी माध्यम माझे प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी...
वरील लिंक वर क्लिक करा.
शुक्रवार दिनांक 5 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी दीड ते साडेचार इयत्ता दुसरी मराठी माध्यम फक्त आदर्श शाळांसाठी प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी.
वरील लिंक वर क्लिक करा.
शनिवार दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत चे इयत्ता पहिली उर्दू माध्यमासाठीचे प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी.
वरील लिंक वर क्लिक करा.
शुक्रवार दिनांक पाच ऑगस्ट 2022 रोजी दुपारी दीड ते साडेचार या वेळेत इयत्ता दुसरी मराठी माध्यम फक्त आदर्श शाळांसाठी प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी.
वरील लिंक वर क्लिक करा.
शनिवार दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी दीड ते सहा इयत्ता दुसरी मराठी माध्यम फक्त आदर्श शाळांसाठी प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी.
वरील लिंक वर क्लिक करा.
सदर ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण माहिती आपल्या अधिनिस्त पर्यवेक्ष यंत्रणेतील अधिकारी शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यापर्यंत पोहोचण्यात यावी तसेच सदर ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षणास संबंधित त्यांना वेळेवर उपस्थित राहणे बाबत आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
वरील प्रमाणे सूचना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद सदस्य सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई पश्चिम दक्षिण उत्तर प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका सर्व यांना दिल्या आहेत.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments