ऑनलाइन बदली प्रक्रिया चुकीची माहिती/चुकीच्या कागदपत्राच्या आधारे बदली करून घेतलेल्या शिक्षकांवर कार्यवाहीबाबत शासन आदेश.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 11 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार आंतर जिल्हा ऑनलाइन बदली प्रक्रियेत चुकीच्या माहितीच्या आधारे अथवा कागदपत्रांच्या आधारे अर्ज सादर करून बदली करून घेतलेल्या शिक्षकांवर कार्यवाही करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दिनांक सात एप्रिल 2021 च्या शासन निर्णय सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणानुसार सन 2022 मधील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन प्रणाली द्वारे करण्याची कार्यवाही सुरू आहे. सदर धोरणातील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत बदली पात्र असलेल्या विशेष संवर्ग भाग एक मधील विशेष संवर्ग भाग दोन मधील शिक्षकांची यादी निव्वळ रिक्त पदांची यादी संभाव्यक्ती पदांची यादी जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे इत्यादी वेळोवेळी शासन स्तरावरून निर्देश देण्यात आले होते. जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या साठी ठरवण्यात आलेले धोरण व त्या अनुषंगाने वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना स्पष्ट असून सदर धोरणातील तरतुदीप्रमाणे ऑनलाइन प्रणाली मार्फत अर्ज सादर करण्यासंदर्भात शिक्षकांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र धारक शिक्षक आणि विशेष संवर्ग एक शिक्षक यांना बदलीमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे बदल्यांमध्ये प्राधान्य देण्यात आलेल्या अशा शिक्षकांनी त्यांचे अर्ज भरताना संपूर्णतः खरी व वस्तुस्थितीदर्शक माहिती भरून अर्ज करण्यापेक्षा आहे. शिक्षकीपेक्षा हा उदात्त पेशा असल्यामुळे व भावी पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याने अशा जबाबदार व्यक्तीकडून अर्ज भरताना जाणीवपूर्वक चुकीची व खोटी प्रमाणपत्रिकागतपत्रे माहिती सादर केली जाणे अपेक्षित नाही.
तथापि काही शिक्षकांकडून संबंधित संवर्गाची पात्रता धारण करीत नसतानाही जाणीवपूर्वक खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज भरलेले आहेत अशा तक्रारी प्राप्त झाले आहेत.
अशा खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे जर अर्ज भरलेल्या व त्या आधारित काही शिक्षकांच्या बदल्या झाल्या तर संबंधित संवर्गाची पात्रता धरण करणाऱ्या खऱ्या पात्र शिक्षकांवर अन्याय होतो. त्यामुळे अशा स्वरूपाच्या तक्रांची विविध चौकशी करून संबंधित शिक्षक दोषी आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करणे अपेक्षित आहे सब वरील बाबी विचारात घेऊन आता खालील प्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येत आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र धारक शिक्षक आणि विशेष संवर्ग एक शिक्षक या संवर्गात जर अर्ज सादर केलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रंची पडताळणी संबंधित जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करावी अशी पडताळणी करताना नैसर्गिक न्याय म्हणून संबंधित शिक्षकांना मान्य मांडण्याची वाजवी संधी देण्यात यावी सदर पडताळणीचे काम टप्प्याटप्प्याने दिनांक 12,13 व 14 ऑगस्ट 2022 या दरम्यान कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे.
पडताळणीअंती ज्या शिक्षकांनी जाणीवपूर्वक खोट्या व चुकीच्या प्रमाणपत्र आधारे अर्ज भरल्याचे सिद्ध होईल त्यांचा अर्ज ऑनलाईन प्रणालीत संबंधित संवर्गातून बात करण्यात यावा व दिनांक 28 जून 2016 च्या शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार निश्चित कार्यपद्धती अनुसरून संबंधित शिक्षकांची एक वेतन वाढ कायमस्वरूपी बंद करण्याची कार्यवाही करण्यात यावी. मात्र बदल्या संदर्भात ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याची अर्ज सादर करण्याची मुदत संपली असल्यामुळे अशा शिक्षकास नव्याने अर्ज भरण्याची मुभा अनुज्ञेय असणार नाही.
वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments