सन 2022 या वर्षात आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषद शिक्षकांना कार्यमुक्त करणे बाबत दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी चा ग्रामविकास विभागाचा आदेश.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर जिल्हा बदल्या ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतची सुधारित धोरण उपरोक्त शासन निर्णय 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयाने विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतुदीनुसार सन 2022 मध्ये राज्यातील एकूण 3943 जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या संगणकीय प्रणाली द्वारे दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या आहेत.
तसेच आता जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्याबाबतची कार्यवाही सुरू करणे आवश्यक आहे.
याकरिता आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतरच रिक्त पदांची माहिती संगणकीय प्रणालीमध्ये अद्ययावत करता येणार आहे.
सदरच्या ऑनलाइन प्रणाली द्वारे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्हा परिषद पुणे यांनी दिनांक 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयानुसार आवश्यक त्या कागदपत्राची तपासणी तालुका स्तरावर करून कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे आपल्या जिल्हा परिषदेतील अंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना दिनांक 5 सप्टेंबर 2022 पर्यंत कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी तथापि कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करताना प्रचलित धोरणानुसार दहा टक्के पेक्षा अधिक पदे रिक्त राहणार नाहीत याची कृपया दक्षता घ्यावी..
असे निर्देश आज दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.
सदर शासन आदेशानुसार 5 सप्टेंबर 2022 पर्यंत आंतरजिल्हा बदली बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करायची आहे व पाच सप्टेंबर नंतर आंतरजिल्हा बदलीने बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर बदली पोर्टलवर रिक्त पदांची माहिती अद्यावत केल्यानंतर जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया सुरू होणार आहे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments