बदली अपडेट, आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत चुकीचे कागदपत्राच्या आधारे अर्ज सादर केलेल्या बदली करून घेतलेल्या शिक्षकांवर कार्यवाही बाबत ग्राम विकास विभागाचे पत्र.
ग्रामविकास विभागाच्या या अगोदरच्या दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी देखील या संदर्भात सूचना देण्यात आले आहेत. त्याद्वारे काही जिल्हा परिषदांनी विशेष संवर्ग भाग दोन पती-पत्नी एकत्रीकरण व सर्वसाधारण संवर्गातून भरलेल्या अर्जाची पडताळणी केली असता या संवर्गात देखील काही शिक्षकांकडून संबंधित संवर्गाची पात्रता धारण करीत नसतानाही जाणीवपूर्वक खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज भरले आहेत असे आढळून आले आहेत अशा खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे जर कर्ज भरल्यास त्या आधारे काही शिक्षकांच्या बदल्या झाल्या तर संबंधित संवर्गाची पात्रता धारण करणाऱ्या खऱ्या पात्र शिक्षकांवर अन्याय होतो सबब वरील बाबी विचारात घेऊन आता खालील प्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येत आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर जिल्हा बदली मध्ये ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एनओसी धारक शिक्षक आणि विशेष संवर्ग एक विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन पती-पत्नी एकत्रीकरण व सर्वसाधारण संवर्ग एकत्रीकरण या संवर्गात अर्ज सादर केलेल्या सर्व शिक्षकांच्या कागदपत्राची पडताळणी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करावी अशा पडताळणी करताना नैसर्गिक न्याय म्हणून संबंधित शिक्षकांना म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देण्यात यावी सदर पडताळणीचे काम टप्प्याटप्प्याने दिनांक 18 व 19 ऑगस्ट या दरम्यान कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे.
पडताळणी यंतीच्या शिक्षकांनी जाणीवपूर्वक खोट्या व चुकीच्या प्रमाणपत्राच्या आधारे अर्ज भरल्याचे सिद्ध होईल त्यांचा अर्ज ऑनलाईन प्रणालीत संबंधित संवर्गातून बाद करण्यात यावा व संदर्भाधीन पत्र क्रमांक एक दिनांक 28 6 2018 च्या शासन परिपत्रकातील तरतुदी नुसार विहित कार्यपद्धती अनुसरून संबंधित शिक्षकांची एक वेतन वाढ कायमस्वरूपी बंद करण्याची कार्यवाही करण्यात यावी मात्र बदल्या संदर्भात ऑनलाईन प्रणाली द्वारे करण्याची अर्ज सादर करण्याची मुदत संपली असल्यामुळे अशा शिक्षकास नव्याने अर्ज भरण्याची मुभा अनुज्ञेय असणार नाही.
वरील नवीन अपडेट किंवा नवीन परिपत्रक ग्रामविकास विभागाने काढलेले असल्यामुळे व सर्वसाधारण संवर्गातील अर्ज भरणाऱ्या शिक्षकांचे अर्ज प्रमाणपत्र पडताळणी करावयाची असल्यामुळे..
या अगोदर 21 ऑगस्ट रोजी निर्गमित होणारे आदेश आता 24 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित होणार आहेत.
वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments