लवकरच जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सुरू..
आंतरजिल्हा बदली प्रक्रिया अंतिम टप्प्यात..
या दिवशी मिळणार आदेश.
आंतरजिल्हा बदली प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून लवकरच म्हणजे दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी आंतर जिल्हा बदली आदेश निर्गमित होणार आहेत.
या अगोदर दिनांक दोन ऑगस्ट ते तीन ऑगस्ट 2022 पर्यंत सर्व जिल्हा परिषदांनी आपले रोस्टर पोर्टलवर अपलोड केले होते. त्यानंतर 4 ऑगस्ट 2022 ला पोर्टलवरच रोस्टर सर्वांसाठी खुले झाले.
सर्व जिल्हा परिषद शिक्षकांनी ज्यांना इतर जिल्हा परिषदेमध्ये बदली करून घ्यायची आहे त्यांनी दिनांक 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2022 पर्यंत आपले ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत.
सदर अर्जंट अर्जांची पडताळणी मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर दिनांक 12 ऑगस्ट 2022 ते 16 ऑगस्ट 2022 म्हणजे आजपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर आज आंतरजिल्हा बदली प्रक्रिये तील संवर्ग एक व दोन यांचे अर्ज पडताळणी पूर्ण झाल्यानंतर.
आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील अर्जांवर दिनांक 17 ऑगस्ट 2022 ते 20 ऑगस्ट 2022 पर्यंत पोर्टल वरील प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
व अंतर जिल्हा बदलीचा अंतिम टप्पा म्हणजे आंतरजिल्हा बदली आदेश निर्गमित होणे हे दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी अपेक्षित आहे.
म्हणजेच ज्यांनी अंतर जिल्हा बदली ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत व त्यांनी भरलेली माहिती पूर्णपणे अचूक आणि बरोबर आहे आणि उपलब्ध संवर्गानुसार पद त्यांच्यासाठी उपलब्ध होणार आहे अशा शिक्षकांच्या बदल्या इच्छित जिल्हा परिषदेमध्ये होणार आहेत त्यांचे आदेश दिनांक 21 ऑगस्ट 2022 ला मिळणार आहेत.
21 ऑगस्ट 2022 ला आंतरजिल्हा बदली आदेश निर्गमित झाल्यानंतर पोर्टलवर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेसाठी पुढील प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments