इयत्ता पहिली (1) ते दहावी(10) करिता विषयवार तासिका विभागणी बाबत SCERT चे संचालक यांचे परिपत्रक.
शैक्षणिक सत्र 2017 18 च्या द्वितीय सत्रापासून पुढील प्रमाणे इयत्ता पहिली ते दहावी करिता विषयवार तासिका विभागणी असणार आहे.
इयत्ता पहिली ते दहावी एका आठवड्यातील अध्ययन कालावधी 45 तासिकांऐवजी 48 तासिका राहतील.
एका वर्गाचा आठवड्याचा एकूण कार्यकाल पूर्वी 26.45 मिनिटे होता प्रस्तावित परिपत्रकानुसार कार्यकाल 27.10 मिनिटे होईल त्यामुळे एकूण कार्यकाला 25 मिनिटांची वाढ होईल.
दिनांक 28 एप्रिल 2017 च्या परिपत्रक प्रमाणे सोमवार ते गुरुवार आठ तासिका असतील पहिली तासिका 40 मिनिटांची व पुढील प्रत्येक तासिका 35 मिनिटांची राहील व प्रत्येक दिवशी परिपाठ दहा मिनिटांचा राहील.
सुधारित परिपत्रकानुसार शुक्रवारी आठ तासिकांऐवजी नऊ तासिका घेण्यात याव्यात व पहिली तासिका 35 मिनिटांची व पुढील प्रत्येक तासिका 30 मिनिटांची राहील.
सुधारित परिपत्रकानुसार शनिवारी पाच तासिका ऐवजी सात तासिका घेण्यात यावा पहिली तासिका 35 मिनिटांची पुढील प्रत्येक तासिका 30 मिनिटांची राहील.
सुधारित वेळापत्रक नुसार शुक्रवार व शनिवारच्या तासिका ह्या कला आणि आरोग्य शिक्षण या विषयांसाठी देण्यात याव्यात.
वरील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद चे संचालक यांचे वर्ग पहिली ते दहावी विषयवार तासिका विभागणी बाबतचे परिपत्रक संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments