बदली पोर्टल महत्वाची सुचना
प्रति,
गटशिक्षणाधिकारी,
पंचायत समिती सर्व.
विषय : बदली पोर्टल सुरु झाल्याबाबत.
उपरोक्त विषान्वये आपणास कळविण्यात येते की, बदली पोर्टल सध्या ओपन झालेले आहे.
आपल्या अधिनिस्त ज्या शिक्षकांच्या दुरुस्त्या राज्यस्तरावर पाठवल्या होत्या त्या दुरुस्त्या झालेल्या आहेत का पाहुन घेण्यास आपल्या अधिनिस्त शिक्षकाना अवगत करावे.
शिक्षणाधिकारी (प्रा),
वरील प्रमाणे बदली पोर्टलवर आपले स्वतःचे म्हणजेच शिक्षकांचे लॉगिन केल्यानंतर आपणास दिसून येते की बी इ ओ फोर्स एक्सेप्ट पेंडिंग प्रोफाइल ऑफ टीचर्स ही प्रक्रिया परत सुरू करण्यात आली आहे.
कारण माध्यमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या अगोदर ऑनलाईन प्रणालीमध्ये समाविष्ट नव्हत्या त्या यावर्षीपासून ऑनलाईन प्रणाली मध्ये समाविष्ट करण्यात आल्या असून अशा माध्यमिक शिक्षकांची प्रोफाइल तयार करून ती एक्सेप्ट करण्याचे काम सध्या पोर्टलवर सुरू आहे.
बदली अर्जासाठी अद्यापही पोर्टल सुरू करण्यात आलेले नाही.
अजूनही काही जिल्हा परिषदेचे बिंदू नामावल्या म्हणजेच रोस्टर पोर्टलवर अपडेट झालेले नाही.
लवकरच बदली पोर्टल बदली अर्जासाठी सुरू होईल अशी आशा करूया. ऑनलाइन बंद आंतरजिल्हा बदल्या पूर्ण होऊन जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया देखील सुरू होऊन निर्विघ्न पार पडेल असे अपेक्षित आहे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments