शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथके आणि दक्षता पथके स्थापन करणे बाबत परिपत्रक.
आज दिनांक 22 जुलै 2022 रोजी शिक्षण संचालक प्राथमिक यांनी शालेय पोषण आहार संदर्भात भरारी पथके व दक्षता समिती स्थापन करण्याबाबत पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत.
नवीन शैक्षणिक वर्षात सुरुवात झाली असून शाळांमधून विद्यार्थ्यांना गरम ताजा आहार उपलब्ध करून देण्यात येत आहे. पृथ्वी राज्यातील शाळांमधून शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीमध्ये विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप कमी करणे, निकृष्ट प्रतीचा आहार मुलांना देणे, आहाराचे वाटप न करणे, योजनेमध्ये गैरव्यवहार करणे, इत्यादी स्वरूपाच्या तक्रारी शासनाकडे येत आहे. तसेच योजनेबाबत वर्तमानपत्रांमध्ये प्रतिकूल सुरुवातीच्या बातम्या छापून येत असतात. या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचा पोषण आहार मिळण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याकरिता खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
शासन निर्णयानुसार शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथक स्थापन करण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.
जिल्हास्तरावरील भरारी पथक कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा परिषदेमधील अधिकारी आणि दोन कर्मचारी यांची भराडी पथकामध्ये नियुक्ती करावी सदर पथकामार्फत जिल्ह्यातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित होत आहे की कसे याबाबत तपासणी करावी.
भरारी पथकमार्फत जिल्ह्यामधील ग्रामीण तसेच नागरी भागातील पात्र शाळांची आणि केंद्रीय स्वयंपाकगृहांची तपासणी करण्यात यावी.
शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भरारी पथकांमध्ये पाठवण्यासाठी अधिकारी कर्मचारी यांचे नावे निश्चित करावी त्यानंतर संबंधित पथका शाळा तपासणीचा कार्यक्रम निश्चित करून द्यावा भरारी पथकास शाळा तपासणीचा कार्यक्रम गोपनीय ठेवण्यात यावा जेणेकरून अचानक शाळा तपासणी होऊन वस्तुस्थिती निदर्शनास ये भराडी पथक कार्यान्वित होण्यासाठी एक अधिकारी आणि किमान दोन कर्मचारी यांची वेळोवेळी नियुक्ती करावी.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरमहा किमान दहा शाळांची तपासणी भरारी पथकामार्फत करण्यात यावी. भारी पथकास शाळा तपासणी करताना आढळून आलेल्या बाबी भरारी पथकाच्या प्रमुखांनी तीन दिवसाच्या अहवाल सादर करून मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या निदर्शनास आणाव्यात. सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर ज्या शाळांमध्ये योजनांची अंमलबजावणी मध्ये त्रुटी आहेत त्या शाळांमध्ये योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात याव्या. मात्र ही योजना राबविताना गैर व्यवहार होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
मुंबई महापालिका अंतर्गत असलेल्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेचे अंमलबजावणी तपासण्यासाठी शिक्षणाधिकारी गव्हन मुंबई महानगरपालिका मुंबई यांनी भराडी पथक कठीण करून शाळा तसेच केंद्रीय स्वयंपाक गृहांची तपासणी करण्यात यावी.
मुक्त प्रमाणे जिल्हास्तरावरील भरारी दक्षता पथकाप्रमाणे तालुका युआरसी स्तरावर देखील भरारी दक्षता पथके स्थापन करून योजनेची तपासणी करावी.
सदर भरारी पथकांकडून संदर्भीय शासन निर्णयानुसार योजनेच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व ठिकाणी व शाळांना भेटी देऊन तपासणी करावी तपासणी दरम्यान आढळून येणाऱ्या कृतींचे तत्काळ निराकरण करणे तसेच योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे देण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी.
शालेय पोचणार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वरील प्रमाणे भराडी पथकांमार्फत यादृच्छिक पद्धतीने तसेच गोपनीय पद्धतीने तपासण्या करण्यात याव्यात. सदर तपासणी बरोबर संबंधित यंत्रणांनी नियमित तपासण्या करणे आवश्यक आहे.
भराडी दक्षता पथकांनी तपासणी करण्याच्या बाबी संदर्भात या पत्रासोबत जोडलेल्या परिशिष्ट अ ब क नुसार तपासणी नमुने देण्यात आले आहेत या नमुन्यांमध्ये आवश्यकतेनुसार अधिकची माहिती समाविष्ट करता येईल.
प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या भरारी पथकांनी केलेल्या शाळा भेटी कार्यक्रमाची माहिती संबंधित शिक्षणाधिकारी यांनी संकलित करून एकत्रित गोषवारा परिशिष्ट ही आणि फ मधील तक्त्यात दरमहा दहा तारखेच्या आत संचालकांच्या ईमेलवर पाठवावी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments