शाळांच्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे महत्त्वपूर्ण पत्र.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 22 जुलै 2022 रोजी आयुक्त सर्व महानगरपालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषद, सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक तसेच मुख्याधिकारी सर्व नगरपालिका/नगरपरिषद यांना शाळांच्या स्वच्छतागृहात मधील स्वच्छतेबाबत पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
जनहित याचिका क्रमांक 107/2021 निकिता नारायण गोरे विरुद्ध महाराष्ट्र शासन या जनहिति याचिकेत याचिकाकर्त्यांनी शाळांमधील अस्वच्छ स्वच्छतागृहांची बाब माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली आहे.
त्या अनुषंगाने शाळेतील स्वच्छतागृहांमधील स्वच्छता आणि स्वच्छतेच्या समस्येवर परिणामकारकरीत्या लक्ष ठेवण्यासाठी हा विशेष शिक्षक पालक संघटना यांच्या मासिक सभेमध्ये समाविष्ट करण्यात बाबतच्या सूचना आपल्या स्तरावरून सर्व शाळांना देण्यात याव्या.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांसाठी वितरित करण्यात येणाऱ्या साधी अनुदानाच्या रकमेतून खर्च करावयाच्या बाबींमध्ये दिनांक 5 जून 2020 रोजीच्या शासन निर्णय सुधारणा करण्यात आली आहे त्यामध्ये शाळा इमारत व स्वच्छतागृहांची देखभाल व दुरुस्ती तसेच वैयक्तिक स्वच्छतेसाठी लागणारी आवश्यक सामग्री या बाबींचा समावेश होत असल्याने निधीचा उपयोग करणे अपेक्षित आहे.
दिनांक 4 जून 2020 रोजी चा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
माननीय उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेचे गांभीर्य लक्षात घेता शाळांमधून स्वच्छता ग्रहांची स्वच्छता राखली जाईल याबाबत दक्षता घेऊन त्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास वेळोवेळी सादर करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments