राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शिष्यवृत्ती परीक्षा 20 जुलै ऐवजी 31 जुलै 2022 ला होणार.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी 2022 परीक्षा पुढे ढकलण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 14 जुलै 2022 रोजी प्रसिद्धी पत्रक निर्गमित केले आहे ते पुढील प्रमाणे.
महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे तसाच तो विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर देखील झाला आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दिनांक 20 जुलै 2022 रोजी राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याबाबत या अगोदर जाहीर करण्यात आले होते. तथापि सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनुभवलेली ऊर्सदृश्य स्थिती व बहुतांश ठिकाणी भूस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थी हित्व त्यांची सुरक्षा लक्षात घेता सदर परीक्षा दिनांक 20 जुलै 2022 ऐवजी रविवार दिनांक 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येईल यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेश पत्र दिनांक 31 जुलै 2022 च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येतील. अशा सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त माननीय शैलजा दराडे यांनी सदर पत्राद्वारे दिले आहेत.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments