शाळांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी उघडावे लागणार एचडीएफसी बँकेत खाते राज्य प्रकल्प संचालकांचे पत्र

 शाळांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी उघडावे लागणार एचडीएफसी बँकेत खाते राज्य प्रकल्प संचालकांचे पत्र.

 

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई चे संचालक माननीय कैलास पागोरे भारतीय प्रशासकीय सेवा यांनी दिनांक 27 जुलै 2022 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार समग्र शिक्षा करिता सिंगल नूडल अकाउंट म्हणून एचडीएफसी बँक यांच्या नियुक्ती बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयात समग्र शिक्षा करिता म्हणून एचडीएफसी बँक यांची निवड प्रक्रिया प्रस्तावित असून त्या अनुषंगाने जिल्हास्तर, मनपा स्थर, एस सी ई आर टी पुणे, तालुकास्तर, शाळा, डायट स्तर केजी बीवी या सर्व इम्प्लिमेंटिंग एजन्सी मधील समग्र शिक्षा करिता आपल्या विविध स्तरावर एचडीएफसी बँक यांच्या अकाउंट उघडणे आवश्यक असून त्याकरिता आपल्या अधिनस्त स्तरावर एचडीएफसी बँक यांचे अधिकारी कर्मचारी यांना अकाउंट उघडण्याकरिता आवश्यक असणारे दस्तावेज व योग्य ते सहकार्य आपल्या स्तरावरून देण्यात यावे जेणेकरून समग्र शिक्षा ची एचडीएफसी बँक मध्ये अकाउंट ओपन होऊन ते पी एफ एम एस प्रणालीद्वारे मॅप करून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषद, मुंबई कार्यालयातर्फे वितरित केलेला निधी विहित वेळेत आपणास प्राप्त होणे निधीचा विनियोग लवकरच लवकर होईल तरी त्याबाबतच्या सूचना आपल्या स्तरावर संबंधितांना देण्यात याव्या. 


अशा सूचना आयुक्त महानगरपालिका सर्व, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे, विभागीय उपसंचालक मुंबई विभाग मुंबई, शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, प्रशासकीय अधिकारी महानगरपालिका सर्व, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व शिक्षण संस्था संबंधित जिल्हा परिषद सर्व, गृहप्रमुख, मुख्याध्यापक, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सर्व यांना देण्यात आले आहे




वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


 

 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.