पुनर्रचित सेतू अभ्यास सन 2022 23 अंमलबजावणीनंतर विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती माहिती संकलना बाबत मार्गदर्शक सूचना.

 पुनर्रचित सेतू अभ्यास सन 2022-23 अंमलबजावणीनंतर विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती माहिती संकलना बाबत मार्गदर्शक सूचना.


पुनर्रचित सेतू अभ्यास सन 2022 23 अंमलबजावणी नंतरच्या विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती माहिती संकलना बाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे चे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.


पुनर्रचित सेतू अभ्यास अंमलबजावणी पूर्वीची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती तपासण्यासाठी इयत्ता दुसरी ते दहावी या इयत्ता मधील विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात आलेली आहे.

त्यानुसार पुनर्रचित सेतू अभ्यास अंमलबजावणीनंतरची विद्यार्थ्यांची अध्ययन सिटी तपासण्यासाठी इयत्ता दुसरी ते दहावी याच इयत्तांची माहिती संकलन करण्यात येणार आहे.

एस सी इ आर टी महाराष्ट्र पुणे यांचे मार्फत सेतू अभ्यासा मध्ये समाविष्ट अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्न निर्धारित करण्यात आले आहेत.

इयत्ता निहाय एकच प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली असून त्यामध्ये संबंधित व्यक्तीतील सर्व विषयावरील प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे (हिंदी विषयाचा समावेश यामध्ये नाही) प्रत्येक विषयासाठी दहा प्रश्न विचारण्यात आले आहेत.

उत्तर चाचणी ही दिनांक 27 जुलै ते 4 ऑगस्ट 2022 या आठ दिवसात राज्यातील विदर्भ वगळून इतर शाळांमध्ये घेण्यात येणार आहे, तर विदर्भातील शाळांमध्ये दिनांक 11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2022 या आठ दिवसात उत्तर चाचणी घेण्यात येणार आहे.

माहिती संकलनाची उपरोक्त लिंक राज्यातील शाळांकरता विदर्भ बघून दिनांक 26 जुलै 2022 रोजी रात्री बारा वाजता सुरू करण्यात येईल व दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी रात्री बारा वाजता बंद करण्यात येईल त्यामुळे दिलेल्या वेळेतच सदर माहिती संकलन प्रक्रिया पूर्ण करावी.

माहिती संकलनाची उपरोक्त लिंक विदर्भातील शाळांकरता दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी रात्री बारा वाजता सुरू करण्यात येईल व दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी रात्री बारा वाजता बंद करण्यात येईल त्यामुळे दिलेल्या वेळेतच सदर माहिती संकलन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.

प्रत्येक जिल्ह्यातील वरिष्ठ व्याख्याता अधिव्याख्याता गटशिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख विषय सहाय्यक विषय साधन व्यक्ती समावेशित शिक्षण तज्ञ विशेष शिक्षक यांच्या मदतीने अस्तित संशोधनासाठी माहिती संकलन करण्यात यावे. आपण सर्व अधिकारी व कर्मचारी हे शिक्षक व विद्यार्थी यांना शैक्षणिक सहाय्य करणारे असल्याने आपण सर्व विद्यार्थ्यांकडून सदर प्रश्नावली सहस्तेने तटस्थपणे भरून घेऊ शकाल असा विश्वास आहे.

प्रस्तुत संशोधनासाठी माहिती संकलन करताना वरिष्ठ अधिव्याख्याता अधिव्याख्याता व गटशिक्षणाधिकारी हे इयत्ता दुसरी ते आठवी विद्यार्थ्यांच्या इयत्तानिहाय प्रत्येक पाच विद्यार्थ्यांची माहिती संकलित करतील तर इयत्ता नववी व दहावी यांच्या इयत्ता नेहा प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांची माहिती संकलित करतील.

विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख विशेष सहाय्यक विषय साधन व्यक्ती समावेशित शिक्षण तज्ञ विशेष शिक्षक हे इयत्ता निहाय प्रत्येकी सहा विद्यार्थी वर्ग पहिली ते आठवीसाठी व वर्ग नववी दहावीसाठी इयत्तानिहाय प्रत्येकी पाच विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांची माहिती संकलित करतील.

प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी पूर्व चाचणीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली आहे त्याच विद्यार्थ्यांची उत्तर चाचणी द्वारे माहिती संकलित करावी.

प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी आपण ज्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली आहे त्यांची यादी प्राचार्य जिल्हा शिक्षण व शिक्षण संस्था यांच्याकडे पुढील जमा करावी व स्वतःकडे देखील जतन करून ठेवावी.






वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.