प्राथमिक शिक्षकांकरिता/इयत्ता पहिली ते आठवी ला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत शासन निर्णय

 प्राथमिक शिक्षकांकरिता/इयत्ता पहिली ते आठवी ला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत शासन निर्णय.


केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची अंमलबजावणी राज्यात दिनांक एक एप्रिल 2010 पासून सुरू करण्यात आली आहे. केंद्र शासनाने दिनांक 31 मार्च 2010 च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवाशर्ती ठरवण्यासाठी कलम 23 नुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद एनसीईटी यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांनी दिनांक 23 ऑगस्ट 2010 व दिनांक 29 जुलै 2011 च्या अधिसूचनेनुसार प्राथमिक शिक्षकांसाठी म्हणजेच इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अहरता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी अनिवार्य केली आहे. त्या अनुषंगाने शासन निर्णय 23 फेब्रुवारी 2013 अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या शिक्षकांकरिता किमान शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता आणि शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अनिवार्य केली आहे.


सदर शासन निर्णय शिक्षक पात्रता परीक्षा बाबत निर्देश देऊनही राज्यात नियुक्त प्राथमिक शिक्षकांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसल्याचे दिसून आले आहे. तसेच सदर शासन निर्णयापूर्वी कार्यरत शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्याबाबत निर्देशित करूनही त्याची अंमलबजावणी बाबत साशंकता आढळून येते. यास्तव प्रस्तुत शासन परिपत्रक अन्वय शासन पुढील प्रमाणे निर्देश देत आहे.


राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती समई म्हणजेच इयत्ता पहिली ते आठवी साठी शासन निर्णय दिनांक 13 फेब्रुवारी 2013 पनवेल केंद्र शासनाने निर्देशित केल्यानुसार किमान शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता व शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी धारण करणाऱ्या उमेदवारांनाच नियुक्त करण्यात यावे. तसेच शासन निर्णय दिनांक 13 डिसेंबर २०१३ ते आजपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांपैकी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी प्रथम तीन संधीत उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील. सदर शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी तीन संगीत उत्तीर्ण न झाल्यास त्यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्यात तसेच यापुढे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती समयी म्हणजेच इयत्ता पहिली ते दहावीला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण उमेदवारांची निवड करण्यात यावी. याप्रकारे उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्यात यावे अशा प्रकारे नियुक्त कंत्राटी शिक्षकास शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान अथवा सेवा विषयक लाभ मिळणार नसून त्यांच्या सेवा आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांची शैक्षणिक हित लक्षात घेऊन सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरण्यात यावे. कंत्राटी नियुक्तीवरील वेतनाचा खर्च संबंधित संस्थेने स्वनिधीतून भगवा परंतु शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारास प्राथमिक शिक्षक सेवक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये.



वरील शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.

Post a Comment

0 Comments