राज्यातील माजी सैनिक, शनिद सैनिक पत्नी व
कुटुंबिय यांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15 टक्के
गुणांची सवलत देणे बाबत शासन निर्णय.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येते सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी ६० टक्के गुण आवश्यक आहे तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त व भटक्या जमाती ती तर मागासवर्ग व दिव्यांग यांच्यासाठी पाच टक्के गुणांची सवलत म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी 55% गुण आवश्यक आहेत शासन निर्णयानुसार माजी सैनिक व शहीद सैनिकाचे कुटुंबीय यांना 15 टक्के समांतर आरक्षण मिळत करण्यात आले आहे. माजी सैनिकांना सैन्यातील वीस वर्षाची सेवा केल्यानंतर त्यांच्या वयाचा विचार करता व इतर उमेदवारांप्रमाणे गुण प्राप्त करणे शक्य होत नाही त्यामुळे सदर आरक्षणांतर्गत पर्याप्त उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदे रिक्त राहतात. देशातील इतर राज्यांनी माजी सैनिक शहीद सैनिक पत्नी व त्यांच्या कुटुंबीयांना शिक्षक भरती मध्ये गुणांची सवलत दिली आहे या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनात देखील शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये सदर घटकास गुणांची सवलत या शासन निर्णयानुसार देण्यात येत आहे.
राजस्थानी स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची पदे भरण्यासाठी पवित्र प्रणाली मार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेत विहित आरक्षणा नुसार माजी सैनिक शहीद सैनिकांच्या पत्नी व त्यांचे कुटुंबीय यांना 15 टक्के गुणांची सवलत देण्यास मान्यता देत आहे म्हणजेच सदर गटातील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
सदर शासन निर्णयातील तरतूद नोव्हेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा व यापुढे घेण्यात येणारा शिक्षक पात्रता परीक्षांना लागू राहील यासाठी आवश्यक ती कार्यवाही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने करावी असे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 30 जून 2022 रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार दिले आहे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments