संचालक स्तरावरून माहे जुलै 2022 ची शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी वेतन/निवृत्ती वेतन तरतूद वितरित.
सन 2022 23 आर्थिक वर्षात नाही जुलै 2022 या महिन्याच्या वेतन व भत्ते निवृत्तीवेतन उपदान याबाबतचा खर्च भागवण्यासाठी शासनाने संचालनालय स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून खाली लेखाशीर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शवलेल्या तरतुदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे.
सदर निधी खालील अटींच्या जिंदाल खर्च करणे संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येत आहे.
ज्या उद्देशून अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशीसाठी खर्च करता येणार नाही.
सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरण पत्रानुसार संबंधित अधिकाऱ्याने लेखाशीर्षणीय कोषागार क्रमांक व दिनांक 6 दरमहा दहा तारखेपर्यंत सादर करावा तसेच खर्च मेळाचा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करावा.
वितरित करण्यात आलेल्या तरतुदी मधून आपल्या स्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये. वरील प्रमाणे मंजूर तरतुदी संगणक वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेले आहेत. तसेच सदरची ज्ञापन शिक्षण अधिकारी प्राथमिक सर्व यांच्या शालेय पोषण आहार योजना व सर्व शिक्षा अभियान यांच्या मेलवर देण्यात आलेले आहे.
वितरित केलेले अनुदान केवळ नियमित वेतनासाठी असून यामधून अन्य कोणतेही देयक अदा करण्यात येऊ नये.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments