आयकर विवरण पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख ३१/०७/२०२३ आहे. त्यानतंर रु.१०००/- दंड आहे.

आयकर विवरण पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख ३१/०७/२०२३ आहे. त्यानतंर रु.१०००/- दंड आहे.



 "या वर्षी एवढा टॅक्स कसा काय लागला ? मागच्या वर्षी तर नव्हता लागला"


किंवा 


"या वर्षी एवढे कागदपत्रे का मागत आहे ? मागच्या वर्षी तर नव्हते मागितले"


👆🏽


वरील वाक्ये या वर्षी प्रत्येक कर सल्लागाराच्या/वकिलाच्या/सिएच्या ऑफिस मध्ये करदात्या कडून ऐकायला मिळत आहेत


तर मित्रानो लक्षपूर्वक खालील माहिती वाचा 


👇🏼


इनकम टॅक्स डिपार्टमेंट ने अशी साईट विकसित केली आहे की प्रत्येक PAN/AADHAR नंबर वर होणारा आर्थिक व्यवहार आता सहजपणे आयकर खात्याला विनासायास प्राप्त होत आहेत


सदर व्यवहाराचे संपुर्ण माहिती A.I.S. म्हणजेच Annual Information Statement  व  T.I.S.   म्हणजेच Taxpayers Information Summery व सोबतच 26 AS या माहिती पत्रकात  Income Tax च्या साईट वर उपलब्ध आहेत . 


रिटर्न भरण्यापूर्वी करदात्याला त्याच्या सगळ्या प्रकारच्या आर्थिक व्यवहाराची माहिती पडताळून पाहण्यासाठी  व त्या अनुषंगाने आपापले इनकम टॅक्स रिटर्न भरणे सोपे जावे यासाठी ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. 


मागील वर्षीपासून Income Tax Return भरण्यापूर्वी वरील सदर माहिती आपल्या रिटर्न मध्ये दाखविणे अनिवार्य झाले आहे. 


सहसा नोकरपेशा करदाते फक्त सॅलरी बेस वर आपापले रिटर्न आज पर्यंत भरत आले असावेत. 


एकदा Form No 16 दिला किंवा पगाराची माहिती दिली की सुटलो असा समज असे. 

 

थोड्याबहुत प्रमाणात व्यापारी/व्यवसायी वर्गात पण हेच चित्र असायचे 


परंतु आता मात्र यापुढे ताकच काय पाणी सुध्दा फुंकून प्यावे लागेल. 


कोणत्याही करदात्यांनी AIS व  TIS मधील माहिती न पडताळता रिटर्न भरले तर त्याला इनकम टॅक्स ऑफिस कडून नोटीस येऊ शकते. 


इनकम टॅक्स हा सर्व मार्गातून मिळालेल्या इनकम वर लागत असतो , मग ते शेती सोडून कोणतेही उत्पन्न असो 


उपरोक्त AIS व TIS मध्ये खालील काही मोजक्या व महत्वाच्या आर्थिक व्यवहाराची माहिती उदाहरणा दाखल दिलेली आहेत


बँकेतील बचत खात्या वरील व्याज 


बँकेतील Fixed Deposit / Term Deposit वरील व्याज 


पगारापासून मिळणारे उत्पन


Shares  ची खरेदी व विक्री


Mutual Fund ची खरेदी व

 विक्री 


SIP म्हणजेच Systematic Investment Plan


बॉण्ड चा व्यवहार


पोस्ट ऑफिस मधील व्यवहार


चल ,अचल स्थावर मालमत्तेची खरेदी किंवा विक्री 


वेगवेगळ्या कंपन्यांचे Divident 


कमिशन 


10 लाखवरील सर्वच प्रकारचे व्यवहार 


SFT म्हणजेच Specified Financial Transactions


करकपात झालेले म्हणजेच TDS केलेले सर्वच प्रकारचे व्यवहार


इत्यादी..... इत्यादी .....

इत्यादी.... 50 पेक्षा जास्त प्रकारच्या आर्थिक व्यवहाराची माहिती उपरोक्त   AIS व TIS मध्ये असल्याने. 

रिटर्न भरताना सदर माहिती लपविल्या जाऊच शकत नाही आणि त्या आधारावर येत असलेला टॅक्स भरावाच लागेल हे पक्के ध्यान्यात ठेवावे लागेल. 


मागील वर्षापर्यंत अनेक प्रकारची माहिती लपविल्या जाऊ शकत होती सहसा Shares किंवा Mutual Fund चे व्यवहार लपविल्या गेल्याचे प्रकर्षांने निदर्शनास आले आहेत. 


पण तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केली आहे त्यामुळे सगळ्याच व्यवहारावर CC TV लागले आहेत असे समजले तरी गैर होणार नाही. 


येणाऱ्या काही दिवसात याची आणखी व्याप्ती वाढलेली दिसेल 


त्यामुळे येईल तो टॅक्स भरून शांत झोप घेणे कधीही चांगलेच राहील करचोरी करणे आता सोपे राहिले नाही


याचा अर्थ हा नाही की आपण व्यवहार किंवा व्यापार करू नये किंवा करताना भीती बाळगुन व्यवहार करावे. असे अजिबात नाही. सर्वच व्यवहार सुरळीतपणे चालू राहू द्यावे


फक्त आता आर्थिक शिस्त लावणे गरजेचे झाले आहे एवढेच 


कायदेशीर मार्गे कर वाचविण्याचे सर्वच पर्याय नियमा प्रमाणे उपलब्ध राहणारच आहे


आता राष्ट्र प्रथम ही भावना लक्षात घेऊन समर्पित भावनेने कर भरून राष्ट्रिय कर्तव्य मात्र पार पाडावे लागेल

आयकर विवरण पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख ३१/०७/२०२३ आहे. त्यानतंर रु.१०००/- दंड आहे.

🙏🏼



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.