बदली अपडेट
शिक्षक बदल्या होतील का ?
शिक्षक संवर्ग सर्वसाधारण बदल्या २०२२
सर्वांना नमस्कार
🙏🏻🙏🏻🙏🏻
शिक्षक संवर्ग सर्वसाधारण बदली प्रक्रियेबाबत एक बातमी सध्या सगळीकडे स्प्रेड होताना दिसतेय की ...
राज्यसरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना नोव्हेंबरपर्यंत स्थगिती...
यावरून बऱ्याच बांधवांनी मला वैयक्तिक फोन करून विचारले की आपल्या बदल्या होतील की नाही ?
तर मी वैयक्तिक बाबतीत ९० % पॉझिटिव्ह आहे की आपल्या बदल्या होणारच! उर्वरित १०% भाग म्हणजे ५ %भाग शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे आणि ५ %भाग राजकीय मानसिकता यांवर अवलंबून आहे !
आपण आता थोड्या नकारात्मक बाबी बघू ... त्यानंतर बदल्या होण्याची शक्यता पडताळून बघू .
बदल्या का होणार नाहीत ?
१} शैक्षणिक नुकसान - आर.टी.ई २००९ नूसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यांसाठी शिक्षक बदल्या या शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी म्हणजे ३१ मे पूर्वी पूर्ण प्रक्रिया राबविण्यात यावी .
२} नवीन मंत्रिमंडळाचा निर्णय - नवीन मंत्रिमंडळाला जर हा धोरणात्मक वाटला नाही तर किंवा नवीन ग्रामविकासमंत्री यांना यांत काही तृटी वाटल्यास अडचणी येऊ शकतात .
३} सॉफ्टवेअर विन्सिट कंपनीचे सॉफ्टवेअर जर शासनाला अयोग्य वाटले किंवा त्यांच्या व्यवहारात जर कमी- जास्तपणा झाला किंवा उर्वरित रक्कम टप्पा देणे घेणे यांत काही अडचण आली तर ...याचा परिणाम होऊ शकतो .
बदल्या का होतील?
१} मार्च २०२२ पासून सुरू झालेली ही प्रक्रिया निरंतर संथ गतीने का होईना सुरू आहे.
२} मंत्रालयीन पातळीवर जी.आर - परिपत्रके काढणे,बदली समिती नेमणूक, परवानग्या घेणे, सॉफ्टवेअर निर्मिती - खरेदी - टेस्टिंग सर्व बाबी पूर्ण झालेल्या आहेत.
३} मंत्रालयीन पातळीवरील कामकाज पूर्ण झालेले असून फक्त प्रशासकिय कामकाज शिल्लक आहे ते व्यवस्थितपणे सुरू आहे.
४} ओबीसी आरक्षणामुळे ग्रामपंचायत, जि.प निवडणुकावर परिणाम झालेला असून आचारसंहिता आड येणार नाही अपवाद नगरपरिषद निवडणुका आहेत ती बाब आपणांस लागू नाही.
५} फेज - १ कामकाज अगदी व्यवस्थित पूर्ण झालेले असून सोशल अपील प्रमाण अगदीच नगण्य आहे.
६} आंतरजिल्हा बदली साठी रोस्टर कामकाज बऱ्याच अंशी पूर्ण असून जेथे अडचण तेथे जुनेच रोस्टर वापरायचे अधिकार मा.सी.ई.ओ यांना दिलेले आहेत.
७} बदली स्थगितीसाठी परिपत्रक काढतांना मागील शासनाने शिक्षक वगळून काढले होते तेच सध्याच्या शासनाने नोव्हेंबर २०२२ पर्यंत कंटिन्यू केलेले दिसते.
८} सध्याच्या सत्ताधारी शासनाने बऱ्याच अडचणींचा सामना केल्याने मागील शासनाने घेतलेले लोकप्रिय निर्णय टाळण्याचा प्रयत्न होणार नाही.
९} बदलीसाठी कालावधी वाढवून घेतलेला दिसून येतो.जर बदल्या होऊ द्यायच्या नसत्या तर तात्काळ रद्द झाल्या असत्या.
१०} मागील २०१७ मधील बदल्यांचा आढावा घेता त्या जुलै पर्यंत झाल्या होत्या ही बाब सकारात्मक आहे.
तरीही बदल्यांसाठी पुढील आठवडा हा निर्णायक असणार आहे.
मी फक्त सकारात्मक - नकारात्मक बाबी सांगितल्या आहेत यांसाठी येणारी वेळ हीच बाब महत्त्वाची आहे.
🙏🏻 🙏🏻 🙏🏻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments