आंतरजिल्हा बदली प्रक्रिया व NOC बाबत महत्वपूर्ण स्पष्टीकरण.
आंतरजिल्हा बदली प्रक्रिया संदर्भात दिनांक 21 जुलै 2022 रोजी झालेल्या वी सी मध्ये एनओसी संदर्भात केलेल्या उल्लेख हा मुळे आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
ज्यामध्ये ज्या जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदली करून जायचे आहे अशा जिल्हा परिषदेची असेल तरच एन ओ सी संवर्गातून बदली पात्र असाल असा उल्लेख होता. त्याबद्दल सविस्तर स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे.
आंतरजिल्हा बदली प्रक्रिया २०२२- २३ मधील सिंगल व दुहेरी NOC बाबत ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मा.राजेश कुमार साहेब यांना शिक्षक संघटनांच्या वतीने शिक्षकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रम विषयी निवेदन देण्यात आले आहे. तसेच याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
NOC बाबत शासन निर्णयात नमूद तरतुदी प्रमाणेच कार्यवाही होणार असून कुठलाही नवीन बदल यात करण्यात आलेला नाही. NOC ही ज्या जिल्ह्यात शिक्षक कार्यरत असतो त्या जिल्ह्याची मात्र ज्या जिल्ह्यात जावयाचे आहे त्या जिल्ह्यामधील संबंधित शिक्षक धारण करीत असलेल्या रिक्त पदावर अथवा भविष्यात रिक्त होणाऱ्या त्या बिंदूवर सामावून घेण्याबाबत दिलेली असते. ज्या जिल्ह्यात जायचे आहे त्या जिल्ह्यांची NOC असल्याचे काहीच कारण नाही.दोन NOC म्हणजे २०१७ पूर्वी बदलीचे ऑनलाईन धोरण अस्तित्वात येण्याआधी आपसी बदलीची प्रकरणे ,अशी प्रकरणे ऑनलाईन धोरणापूर्वीच ऑफलाईन पद्धतीने मार्गी लागली आहेत.तेंव्हा शिक्षकांनी गोंधळून न जाता NOC संवर्गातून अर्ज करतांना सिंगल NOC प्राप्त शिक्षक अर्ज करू शकतात.किंबहुना तेच NOC धारक आहेत.मात्र अर्ज करतांना काही शिक्षकांकडे एक पेक्षा जास्त जिल्हा परिषदच्या NOC असल्यास तो शिक्षक एकाच जिल्ह्याकरिता व एकाच NOC चा लाभ घेऊ शकतो.
NOC धारक शिक्षक - NOC धारक शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांकडे ज्या जिल्ह्यात जायचे आहे त्या जिह्याची NOC मात्र ती कार्यरत जिल्हा परिषदेने दिलेलीच असेल.
NOC धारक शिक्षकांमध्ये प्राधान्यक्रम - NOC धारक शिक्षकांमध्ये बदली प्राधान्यक्रम ठरवितांना यात आता अंशतः बदल करण्यात आला आहे.तो पुढील प्रमाणे असेल,
१) NOC दिनांक ऐवजी सेवा जेष्ठता. २)सेवाजेष्ठता सारखी असल्यास जन्म दिनांक
३) जन्म दिनांक सारखे असल्यास आडनाव
NOC संवर्गाला बदली प्रक्रियेत सर्व प्रथम प्राधान्य असून त्या नंतर संवर्ग १ , संवर्ग २ व नंतर सर्वसाधारण संवर्ग या प्रमाणे प्राधान्यक्रम असेल.ज्या शिक्षकांकडे NOC आहेत आणि ते संवर्ग १ अथवा २ मध्ये येतात त्यांनी कुठल्याही एक सवर्गामधूनच अर्ज करायचा आहे.तो निर्णय संबंधित शिक्षकाचा असेल.
NOC मधून अर्ज केलेल्या शिक्षकाचा ज्या जिल्ह्याची NOC असेल त्या जिल्ह्यासाठीच NOC मधून विचार होईल.इतर जिल्ह्यांसाठी त्याचा सर्वसाधारण मधून विचार केला जाईल.याची नोंद घ्यावी.
पेसा बाबत महत्वाचे- जे जिल्ह्यामध्ये पेसा क्षेत्र आहे.अश्या जिल्ह्यांमध्ये आपण पेसा मधील आहेत का? अश्या प्रश्नासाठी जे शिक्षक अनुसूचित जमातीचे ( ST) प्रवर्ग मधून निवड झालेले असतील मात्र स्थनिक पेसा क्षेत्रातील रहिवासी असतील म्हणजेच त्यांच्याकडे तसा सक्षम पुरावा असेल अश्या शिक्षकांनाच पेसा मधील रहिवासी आहे का? त्याला हो करायचे आहे. इतरांकरिता तो पर्याय नाही.
एका शिक्षकाला एकाच कॅडर चा लाभ घेता येणार आहे.आंतरजिल्हा बदली प्रक्रियेची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून रोस्टर संबंधी ३४ जिल्हा परिषदेची माहिती पूर्णत्वाच्या दिशेने आहे.येत्या दोन दिवसात आंतरजिल्हा बदली करिता पोर्टल सुरू होणार आहे.तशी सूचना ग्रामविकास स्तरावरून लवकरच देण्यात येणार आहे.
आंतरजिल्हा बदली बाबत दिनांक 21 जुलै 2022 च्या व्हीसी मधील सूचना
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
4 Comments
अतिशय छान माहिती. परंतु तसा video सुध्दा vynsis कडून यायला हवा सर. तसे निवेदन संघटनेकडून यायला हवे.
ReplyDeleteतशी निवेदने विविध संघटनांकडून दिल्या गेली आहेत
Deleteआंतरजिल्हा बदली पोर्टल कधी सुरू होणार आहे सर
ReplyDeleteउद्या किंवा मंत्रिमंडळ विस्तारा नंतर
Delete