महत्त्वाची सूचना - अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती 2022 - 23 चे फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत.

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती विशेष




मुख्याध्यापक

सर्व व्यवस्थापन सर्व माध्यम.

प्राथमिक, माध्यमिक जिल्हा परिषद .

        सन 2022- 23 करिता अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना देय असलेल्या शिष्यवृत्तीचे फ्रेश व रिन्यूअल अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. रिन्यूअल अर्ज भरावयाच्या विद्यार्थ्यांची यादी शाळेच्या लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.


      तरी सर्वप्रथम आपल्या शाळेतील रिन्यूअल विद्यार्थ्यांची यादी काढून त्या विद्यार्थ्यांचे रिन्यूअल फॉर्म भरावेत व या यादी व्यतिरिक्त आपल्या शाळेत शिक्षण घेत असलेले अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी व या शिष्यवृत्तीचे अटी पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे फ्रेश अर्ज भरावेत.


       तसेच नोडल ऑफिसर लॉगिन करून सर्वप्रथम नोडल ऑफिसर प्रोफाइल अपडेट करून घ्यावी गेल्यावर्षी केलेली असेल तरीसुद्धा या वर्षी पुन्हा करावी.

विलंबास आपणास जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.


अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती बाबत. 


Scholarships.gov.in


सर्व शाळांनी शाळेचे प्रोफाइल अपडेट करावयाचे आहे शाळेचे प्रोफाईल अपडेट केले शिवाय NSP पोर्टल वर ती कोणत्याही विद्यार्थ्यांचा अर्ज पडताळणी करता येणार नाही याची नोंद घ्यावी..(नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यापूर्वी सर्व शाळांनी आपले प्रोफाइल अपडेट करावे)


शाळेचे प्रोफाईल update करण्यासाठी  NSP portal open करून institute login page open करा.


लॉगिन type institute nodal निवडा.


शैक्षणिक वर्ष 2021-22 निवडा.


Login ID व पासवर्ड टाका.


Captcha code टाकून लॉगीन करा.


Administration मेनू open करून update profile वरती click करा.


Institute details मध्ये शाळेची माहिती पुढील प्रमाणे भरा.

शाळेचे नाव as per nsp/ as per dise या पैकी जे बरोबर असेल ते निवडा. तुम्ही जे न निवडाल त्यावरीलच जिल्हा निवडला जाईल.(as per nsp किंवा as per dise)(काही शाळांचा जिल्हा चुकीचा दाखवत असेल त्यांनी याद्वारे दुरुस्त करून घ्या.)


शाळेचा प्रकार निवडा (शासकीय/खाजगी/अनुदानित..... इ.)


बोर्ड व राज्य  निवडा.


शाळेचा पत्ता अचूक भरा.


Contact person details मध्ये शाळेच्या नोडल ऑफिसर यांची माहिती भरा.


यामध्ये आधार कार्ड वरती जी माहिती आहे तीच माहिती पुढील प्रमाणे भरा.

आधार नंबर, आधार कार्ड वरील नाव, जन्म तारीख, लिंग, मोबाईल नंबर, email , पद ई.(नोडल ऑफिसर हे शाळेचे मुखाध्यापक किंवा मुख्याध्यापकांनी नेमलेले शाळेचे कर्मचारी असावेत.)(नोडल ऑफिसर यांची माहिती आधार वरील माहितीशी मॅच झलेल्यानतर otp येईल त्यानंतरच तुम्ही प्रोफाईल update करू शकाल त्यामुळे सर्व माहिती अचूक भरा.)


Head of institute  मध्ये शाळेच्या मुख्याध्यापक यांची माहिती भरा.


मुख्याध्यपक यांचे आधार कार्ड वरील नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल, पद इत्यादी.


सर्व माहिती अचूक भरले नंतर final submit या बटणावर क्लिक करा.


शिक्षणाधिकारी(मा.प्रा.)


 शिक्षणाधिकारी

 (माध्यमिक; प्राथमिक)

जिल्हा परिषद सर्व


अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती 2022 - 23 चे फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत.


अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी लिंक👇


https://scholarships.gov.in/fresh/newstdRegfrmInstruction



त्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत.


🔘 आधार कार्ड चे झेरॉक्स.


🟣 बँक पासबुकची झेरॉक्स.


🟣 मोबाईल सोबत असावा

 

🟣 बोनाफाईड (बोनाफाईडवर दाखल खारीज क्रमांक व हजेरीचा रोल क्रमांक असणे आवश्यक.

🟣 गुणपत्रिका


🟣 उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा.


वाचा👇


अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती अर्ज मोबाईल वरून कसा करावा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


 

 


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.