राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत सुधारणा करणेबाबत - शासन निर्णय.
विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचविल्या शेतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षाकवच देण्याच्या दृष्टीने राज्यातील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना विमा कंपनीमार्फत दिनांक 20 ऑगस्ट 2003 पासून राबविण्यात येत होतो यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे विम्याचे हप्ते एकत्रितरीत्या भरण्यात करण्यात येत होते.
विमा कंपन्या विविध कारणे सांगून विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई देण्याबद्दल टाळाटाळ करीत होत्या किंवा उशीर लावत होत्या विद्यार्थ्यांच्या अपघातांची दावे लवकर निकाली लागत नसल्याबाबत विमा कंपनीमार्फत योजना बंद करून त्याऐवजी सानुग्रह अनुदान योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा निर्णय शासनाने शासन निर्णय दिनांक 11 जुली 2011 बघितला सदर योजना 27 ऑगस्ट 2010 ते 26 ऑगस्ट 2012 पर्यंत राबविण्यात आली.
तत्वावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत करण्यात आलेल्या वरील योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना दिलासा मिळालेला आहे या योजनेची फलश्रुती लक्षात घेता ही योजना 27 ऑगस्ट 2012 पासून नियमित स्वरूपात सुरू करण्यात आली आहे सन 2013 पासून वाढलेली महागाई व विद्यार्थ्यांच्या अपघाताची वेगळे स्वरूप या अनुषंगाने योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या सर्व बाबींचा विचार करून शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
राबविण्यात येत असलेल्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना खालील सुधारणांसह नियमित स्वरुपात राबविण्यात यावी.
सदर योजना इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या सर्व मुलामुलींसाठी लागू राहील.
सदर योजनेमध्ये विद्यार्थ्यांचा अपघात जखमी झाल्यास म्हणून या सानुग्रह अनुदान व त्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे खालील प्रमाणे राहतील.
विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला एक लक्ष 50 हजार रुपये एवढेच सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास विद्यार्थ्याला एक लक्ष रुपये एवढेच सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास 75 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. विद्यार्थ्याचा अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त एक लक्ष रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
विद्यार्थी आजारी पडून सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास एक लक्ष 50 हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
विद्यालय विद्यार्थी कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास क्रीडा स्पर्धेत खेळताना शाळेतील जडवस्तु कडून थंडीमुळे विजेचा धक्का लागून वीज अंगावर पडून यासाठी प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये सानुग्रह अनुदान विद्यार्थ्यांना मिळेल.
या योजनेत खालील बाबींचा समावेश असणार नाही.
आत्महत्येचा प्रयत्न करणे.
आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे.
गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात.
अमली पदार्थांच्या अमलाखाली असताना झालेला अपघात.
नैसर्गिक मृत्यू.
मोटार शर्यतीत अपघात.
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानाची रक्कम पुढील प्राधान्यक्रमानुसार अदा करण्यात येईल.
विद्यार्थ्याची आई.
आई हयात नसल्यास वडील.
विद्यार्थ्यांची आई-वडील हयात नसल्यास 18 वर्षावरील भाऊ किंवा अविवाहित बहीण किंवा पालक.
या योजनेतील प्रस्ताव निकाली काढण्यासाठी खालील प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात समिती गठित करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी - अध्यक्ष.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद - सदस्य
शिक्षणाधिकारी माध्यमिक - सदस्य.
पोलीस अधीक्षक - सदस्य
जिल्हा आरोग्य अधिकारी - सदस्य
शिक्षणाधिकारी प्राथमिक सदस्य - सचिव.
या संदर्भातील संपूर्ण शासन आदेश पुढील प्रमाणे.
वरील महत्वपूर्ण शासनादेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments