दहावीचा ऑनलाइन निकाल आज जाहीर होणार.
महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून दिली माहिती..
महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री यांच्या अधिकृत ट्विट पाहण्यासाठी.राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC Board) इयत्ता दहावीच्या ssc result परीक्षेचा निकाल शुक्रवार १७ जून रोजी ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल. दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.
खालील लिंकवर निकाल पाहता येईल
● www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
● www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
या परीक्षेस १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा..!!
ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती http://verification.mh-ssc.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments