शिक्षणाधिकारी "योजना" नावाचे तिसऱ्या पदाची निर्मिती शिक्षणाधिकारी निरंतर पद कायमचे बंद.
अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालयाचे नामांतरण शिक्षण संचालनालय योजना.
जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी दर्जाची तीन पदे याअगोदर कार्यरत होती त्यापैकी शिक्षणाधिकारी निरंतर हे पद कायमचे बंद करण्यात आले व शिक्षणाधिकारी निरंतर चा कार्यभार शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे देण्यात आला. परंतु आजच्या शासन निर्णयानुसार पुन्हा तिसरे शिक्षणाधिकारी पद तयार करण्यात आले आहे व शिक्षणाधिकारी निरंतर यांच्या ताब्यात असलेले ऑफिस हे शिक्षणाधिकारी योजना हे नवीन पद तयार करून जिल्हा स्तरावर पुन्हा तिसर्या शिक्षणाधिकारी पदाची निर्मिती दिनांक 22 जून 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार करण्यात आलेली आहे.
व या अगोदरचे अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालय या राज्य स्तरावरील संचालनालयाचे देखील नामांतरण "शिक्षण संचालनालय योजना" असे करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालय कडे असलेले सर्व विषय शिक्षणाधिकारी निरंतर ही या अगोदर पाहत होते परंतु अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालय बंद करून त्याऐवजी त्याचे नामांतर शिक्षण संचालनालय योजना असे करण्यात आले आहे.
मुख्याध्यापक व शाळा प्रमुख साठी महत्त्वाचे
यानंतर पुढील यादी दिलेल्या योजनांत संबंधित पत्र व्यवहार करताना शिक्षणाधिकारी माध्यमिक किंवा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी पत्र व्यवहार न करता शिक्षण अधिकारी योजना यांची शिप पत्रव्यवहार करावा लागेल.
दिनांक 22 जून 2022 रोजी त्यासंबंधीचा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निर्गमित करुन शिक्षण संचालनालय योजना यांच्याकडे पुढीलप्रमाणे योजना शिक्षण संचालनालय प्राथमिक व शिक्षण संचालनालय माध्यमिक यांचेकडून वर्ग करण्यात आल्या आहेत. तसेच या अगोदर अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालय आहे यांच्याकडे असलेला कार्यभार देखील शिक्षण संचालनालय योजना यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे.
दिनांक 22 जून 2022 रोजी चा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शिक्षण संचालनालय योजना व शिक्षणाधिकारी योजना पदनिर्मिती संदर्भात संपूर्ण शासनादेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments