राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे 2022-23 शैक्षणिक सत्र सुरू करणे बाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक 10 जून 2022 रोजी चा शासन निर्णय.
शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस मध्ये दुसरा सोमवार दिनांक 13 जून 2022 रोजी शाळा सुरू करण्यात येतील तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता येतील शाळा चौथा सोमवार दिनांक 27 जून केले सुरू होतील. या अनुषंगाने पुढील प्रमाणे सूचना शासन आदेशात देण्यात आल्या आहेत.
1
दिनांक 13 जून 2022 ते 14 जून 2022 रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहुल शाळेची स्वच्छता करणे शाळेची सौंदर्यीकरण करणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची covid-19 प्रादुर्भाव तसेच आरोग्यविषयक बाबींचे अनुषंगाने उद्बोधन करणे याचे आयोजन करण्यात यावे. दिनांक 15 जून 2022 पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात तसेच विदर्भातील शाळांबाबत दिनांक 27 जून 2022 व दिनांक 28 जून 2022 रोजी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता शाळेची सौंदर्यीकरण करणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची covid-19 संदर्भात उदबोधन करणे याचे आयोजन करण्यात यावे. दिनांक 29 जून 2022 पासून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना शाळेत बोलवून शाळा सुरू करण्यात यावी.
2
शालेय शिक्षक व इतर कर्मचारी यांनी covid-19 प्रतिबंधात्मक लसीकरण याच्या दोन्ही मात्रा व त्यानंतरचा बूस्टर मात्र घेण्यासाठी विभागाच्या स्तरावरून आवश्यक कार्यवाही करावी.
3
वयोगट बारा वर्षे व त्यापुढील विद्यार्थ्यांचे covid-19 प्रतिबंधात्मक लसीकरण व्याप्ती वाढविण्यावर भर द्यावा.
4
Covid-19 योग्य वर्तन चे शाळा व शालेय परिसरात पालन होईल याबाबत शालेय प्रशासन आणि दक्षता घ्यावी.
5
ज्या विद्यार्थ्यांना ताप किंवा इतर गोड सहर्ष लक्षणे आढळल्यास कशा पाल्यांना शाळेत न पाठविण्याबाबत संबंधित पालकांना शाळा प्रशासनाने सचना द्याव्यात व शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांमध्ये ताप किंवा इतर सदस्य लक्षणे आढळल्यास अशा विद्यार्थ्यांचे शालेय स्तरावर तात्काळ विलगीकरण करण्यासाठी व्यवस्था शालेय प्रशासनाने करावी सदृश्य लक्षणे आढळलेल्या विद्यार्थ्यांची तात्काळ रॅपिड टेस्ट/ rt-pcr टेस्ट करावी.
6
ज्या विद्यार्थ्यांची covid-19 चाचणी पॉझिटिव्ह असेल तर विद्यार्थ्यांच्या निकट संपर्कात असणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा रॅपिड टेस्ट किंवा rt-pcr करण्याबाबत कार्यवाही करावी.
7
शासनाकडून आरोग्य विभागाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी निर्देश सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत तसेच यापुढे करण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी.
8
शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचे पालकांचे covid-19 प्रादुर्भाव संदर्भातील व त्या अनुषंगाने प्रबोधन आणि उद्बोधन करण्यात यावे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments