सन 2022-23 या शैक्षणिक वर्ष शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करणेबाबत माननीय शिक्षण आयुक्त यांच्या अतिशय महत्त्वाच्या सूचना.
covid-19 या संसर्गजन्य आजार यामुळे मार्च 2020 पासून शाळा बंद होत्या covid-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासन स्तरावरून शासन निर्णय दिनांक 20 जानेवारी 2020 नुसार शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
मागील दोन वर्षातील covid-19 च्या परिस्थितीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे नियमित शाळेत येणे बंद होते या दरम्यान च्या काळात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक अध्ययन कमाल पातळीपर्यंत झाली असल्याबाबत स्पष्ट दिसून येत नाही तसेच शाळांमधील शैक्षणिक सोयी सुविधांमुळे सुद्धा अस्ताव्यस्त झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दिनांक 15 जून दोन हजार बावीस व विदर्भातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दिनांक 29 जून दोन हजार बावीस रोजी प्रारंभ होणार आहे विद्यार्थ्यांना शाळेची ओढ अवस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरू होण्याच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी दर्जेदार तसेच उत्सुकतेने होणे अपेक्षित आहे या पार्श्वभूमीवर सत्र 2022-23 मध्ये इयत्ता पहिली ते बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सवाच्या प्रसंगी स्वागत करणे आवश्यक आहे. मोबाईल त्या अनुषंगाने स्थिती प्रमाणे आपल्या स्तरावर कार्यवाही करण्यात यावी.
शाळेच्या परिसरातील वयोगट 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश झाले असल्याची खात्री करण्यात यावी.
शाळाबाह्य झालेली किंवा असलेल्या पालकांचा शोध शाळा पूर्वतयारीच्या कालावधीमध्ये करण्यात यावा निदर्शनास आल्यास अशा बालकांना शाळेत प्रवेश देण्यात यावे.
नदीच्या परिसरात दगडखाणी, वीटभट्टी, बांधकामाची स्थळ, उद्याने, बाजारपेठा, पदपथ सिग्नल, कुटीर उद्योग, कामगार वस्त्या यासारख्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात यावे.
शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी आपण व आपल्या अधिनस्त प्रत्येक अधिकाऱ्यांनी व्यक्तीचा किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी उद्बोधन प्रबोधन करावे.
विद्यार्थ्यांचे स्वागत फुल किंवा अन्य शालेय साहित्य स्थानिक स्त्रोत मध्ये उपलब्ध उपयोग सामुग्री देऊन करण्यात यावे. विद्यार्थ्यांमध्ये शाळेत उपस्थित राहण्याची आवड निर्माण करण्यासाठी शाळेतील वातावरण चैतन्यमय आणि उत्साहवर्धक इत्यादीचे व्यवस्थापन करण्यास मार्गदर्शन करावे.
मागील दोन वर्षात विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित नसल्याने सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक व शिक्षक यांची विचार विमर्श करून अध्ययन निष्पत्ती साठी उपाय योजना अभ्यासक्रम इतर विविध शैक्षणिक साधनांचा प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत उत्पादन व सहकार्य करावे.
शाळा प्रवेशोत्सव च्या कार्यक्रमाची स्थानिक पातळीवर प्रसारमाध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी.
शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्यार्थ्यांचे माजी शिक्षक आणि पदाधिकारी ग्रामस्थ इत्यादी व्यक्तींचे सहकार्य घेण्यात यावे.
शासन निर्णयातील मार्गदर्शक निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments