राज्यातील आदर्श शाळा विकासासाठी अरविंद सोसायटी सोबत सामंजस्य करार

 आदर्श शाळांमध्ये श्री अरबिंदो सोसायटी मार्फत प्रस्तावित रूपांतर कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांची अंमलबजावणी होण्यासाठी सहकार्य करणे बाबत MSCERT चे संचालक यांचे पत्र.

आपणास विहितच आहे की, शासन नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, कस्तुरबा गांधी विद्यालय, शासकीय विद्यानिकेतन व नागरी भागातील शाळा यांचा समावेश करून पहिल्या टप्प्यात 488 शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील शिक्षण क्षेत्रात नवकल्पनांची व्यापक स्वरूपाची पद्धतशीर अंमलबजावणी तसेच आरो शिष्यवृत्ती उपक्रम आखणी करण्याच्या अनुषंगाने व संबंधित आदर्श शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र शासन व श्री अरबिंदो सोसायटी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

आदर्श शाळा म्हणून निवड झालेल्या शाळांमध्ये सदर रूपांतर कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये सुरु करण्यात येणार आहे. अरबिंदो सोसायटी मार्फत SAS राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे स्वरूप पुढील प्रमाणे.

1) ZIIEI/IPAAC आदर्श शाळा प्रकल्प आधारित अध्ययन:

ZIIEI हा एक अभिनव दृष्टीकोन आहे जो संपूर्ण शिक्षण व्यवस्थित क्रांती घडून आणण्यासाठी तयार करण्यात आला आहे. ZIIEI हा एक उपक्रम आहे जो शिक्षण प्रणालीला शक्य तितका सर्वोच्च व्यासपीठावर नेण्याचा मानस आहे. अशा प्रणालीमुळे शिक्षणातील तळागळातील न व कल्पनांचा व्यापक पद्धतशीर अंमलबजावणी सुलभ होईल ज्यामुळे विद्यमान प्रणाली आणि प्रक्रिया शून्य किंवा कमी खर्चात सुधारू शकतात. ZIIEI प्रथम शिक्षकांना एक संकल्पना म्हणून नाविन्यपूर्ण देखरेख निर्देश करते आणि त्यानंतर दरवर्षी शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांनी सादर केलेल्या उत्कृष्ट शून्य गुंतवणुकीच्या कल्पनांची विस्तृत पद्धतशीर अंमलबजावणी सुलभ करते. सद्यस्थितीत राज्यातील 488 आदर्श शाळांच्या गुणवत्तापूर विकासासाठी सदर उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

हा संपूर्ण वर्षभर ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम शिक्षक समृद्धी करण्यासाठी असून त्यामध्ये एकूण 45 प्रतिमाने यांचा समावेश आहे. प्रकल्पाधारित अज्ञानावर आधारित सदर प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. सदर संस्थेमार्फत प्रशिक्षणादरम्यान अनुषंगिक सहकार्यासाठी एक जिल्हा सुलभक CBT CAPACITY BUILDING TRAINING उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

2)आरो स्कॉलरशिप:

आरुष शिष्यवृत्ती कार्यक्रम हाय राष्ट्रव्यापी सूक्ष्म शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण परिणाम साध्य करण्यासाठी आणि शिक्षक पालक यांना मदत करण्यासाठी प्रीत करणे आहे. हा कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांच्या इयत्ता पहिली ते बारावी शिकण्याच्या परिणामांवर लक्ष केंद्रित करतो आणि 

www.auroscholar.com आणि आरो स्कॉलर ॲप द्वारे कार्य करतो.

शिष्यवृत्ती कार्यक्रम स्वरूप:

अ] प्रत्येक महिन्याला वीस प्रश्‍नांचा समावेश असणारी प्रश्नावली देण्यात येईल त्यामध्ये हिंदी इंग्रजी गणित सामाजिक शास्त्र विज्ञान यांचे प्रत्येकी चार प्रश्न व सदर प्रश्न राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील.

ब] अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे त्यांनी निवड केलेल्या विषयांवर आधारित प्रश्न असतील.

 क] ज्या विद्यार्थ्यांनी मुक्तक मूल्यांकन मध्ये 80 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहे त्यांना प्रत्येक बरोबर प्रश्नासाठी पन्नास रुपये या प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येईल.

3 प्रकल्प समावेश:

या कार्यक्रमाचे उद्दिष्ट एक संपूर्ण इकोसिस्टीम तयार करणे आहे जिथे विशेष गरजा असलेल्या बालकांचा शैक्षणिक प्रवासात परिचय आदर काळजी आवश्यक पाठिंबा दिला जातो त्यामुळे जिल्हा सुधारित कळती दर नैतिकता मूल्य आणि जीवनाचा दर्जा या दृष्टीने सामाजिक बदल घडून आणणे.

हा कार्यक्रम विचरण चक्र म्हणून विकसित केला आहे तिथे शिक्षकांना प्रथम विशेष गरजा असलेल्या मुलांना बद्दल संवेदनशील केले जाईल आणि विशेष गरजा असलेल्या मुलांना बद्दल सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन ठेवण्यास सक्षम केले जाईल त्यानंतर सी डब्ल्यू एस एन च्या पालक आणि भावंडासह शिक्षकांना मुलांच्या शिक्षणास समर्थन देण्यासाठी साधने आणि तंत्र सह सक्षम केले जाईल.

4)नियतकालिक अद्यावत बाबीचे पुनरावलोकन आणि बैठका:

कोणत्याही कार्यक्रमात राज्य जिल्हा आणि तालुका स्तरावर संबंधित जिल्ह्यातील पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांनी द्वारे आढावा बैठक आयोजित केले जातील या चर्चा वर्गाच्या निरीक्षणात्मक अभिनयावर आणि आवश्यक असल्यास अभ्यासक्रम सुधारणा यावर लक्ष केंद्रित करतील अशा कोणत्याही बैठकीमध्ये श्री अरबिंदो सोसायटीचे प्रतिनिधी सहभागी होतील.

उपरोक्त नमूद बाबींच्या अनुषंगाने आदर्श शाळा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी श्री अरविंद सोसायटी मार्फत प्रस्तावित रूपांतर कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक सहकार्य करणे बाबत आपल्या क्षेत्रातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षकीय यंत्रणेतल्या सर्व घटकांना अवगत करावे असे निर्देश माननीय संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांनी दिले आहेत.

सदर उपक्रमाची प्रभावी व यशस्वीरित्या अंमलबजावणी होण्यासाठी योग्य ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी या अनुषंगाने आवश्यकतेनुसार मार्गदर्शक सूचना वेळोवेळी निर्गमित केले ते आपल्या कार्यालयामार्फत सदर उपक्रम अंमलबजावणीचा जिल्हानिहाय वस्तुनिष्ठ मासिक अहवाल असतात कार्यालयास iqcdept@maa.ac.in या मेलवर विनाविलंब सादर करण्यात यावा



वरील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संचालकांचे पत्र पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.