राज्यातील शाळा सुरु करणे बाबत शिक्षण आयुक्तांचा सुधारित आदेश..
महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त माननीय सुरज मांढरे यांनी दिनांक 19 जून दोन हजार बावीस रोजी काढलेल्या आदेशानुसार राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे सन 2022-23 शैक्षणिक वर्ष सुरू करणे बाबत सूचना निर्गमित केल्या आहेत.
दिनांक 11 एप्रिल 2022 च्या शासन निर्णयानुसार संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीने एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत निर्देश निर्गमित केले आहेत.
त्यानुसार शैक्षणिक वर्ष बावीस-तेवीस मध्ये दुसरा सोमवार दिनांक 13 जून 2022 रोजी शाळा सुरू करण्यात येतील तसेच जून महिन्यातील विदर्भातील तापमानाचा विचार करता तेथील शाळा चौथा सोमवार दिनांक 27 जून दोन हजार बावीस रोजी सुरू होती या अनुषंगाने सूचना देण्यात येत आहेत.
दिनांक 13 जून 2022 ते 14 जून 2022 रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहुल शाळेची स्वच्छता करणे शाळेची सौंदर्यीकरण करणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची covid-19 प्रादुर्भाव तसेच आरोग्यविषयक बाबींचे अनुषंगाने उद्बोधन करणे याचे आयोजन करण्यात यावे. दिनांक 15 जून 2022 पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात तसेच विदर्भातील शाळांबाबत दिनांक 24 जून 2022 व दिनांक 25 जून 2022 रोजी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता शाळेची सौंदर्यीकरण करणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची covid-19 संदर्भात उदबोधन करणे याचे आयोजन करण्यात यावे. दिनांक 27 जून 2022 पासून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना शाळेत बोलवून शाळा सुरू करण्यात यावी.
शासनाकडून आरोग्य विभागाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी निर्देश सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत तसेच यापुढे करण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी.
शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचे पालकांचे covid-19 प्रादुर्भाव संदर्भातील व त्या अनुषंगाने प्रबोधन आणि उद्बोधन करण्यात यावे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments