शिक्षक बदली प्रक्रिया -२०२२ बाबत महत्वपूर्ण ..!
प्रोफाईल अपडेट नंतर काय?
प्रोफाइल अपडेट मुदतवाढ
Phase-1 मधील महत्वपूर्ण टप्पे
➡️पहिला टप्पा-
सर्व कार्यरत शंभर टक्के शिक्षकांनी प्रोफाईल अपडेट करणे व Verify करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे Submit करणे.आज दि.२० रोजी सर्व शिक्षकांनी आपले प्रोफाईल अपडेट करून वेरीफाय ( पुनर्तपासनी ) करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांचेकडे पाठविणे आवश्यक आहे.ज्या शिक्षकांच्या बेसिक डिटेल्स मध्ये काही चुका असतील अश्या शिक्षकांनी सुद्धा आपले प्रोफाईल सबमिट करावे.
सध्याच्या वेळापत्रकानुसार-
कालावधी-१३ जून ते २० जून २०२२
➡️दुसरा टप्पा-
गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व शिक्षकांचे प्रोफाईल तपासणे व Verify करून Accept ( स्वीकारणे ) करण्यासाठी शिक्षकांकडे परत पाठविणे.
कालावधी-१३ जून ते २२ जून २०२२
➡️तिसरा टप्पा-
गटशिक्षणाधिकारी यांनी Verify केलेली किंवा बदल केलेली माहिती शिक्षकांना मान्य नसेल तर शिक्षणाधिकारी यांच्याकडे appeal करणे.या ठिकाणी आपली आधी चुकीची असलेली माहिती शिक्षकांना शिक्षणाधिकारी यांचे कडून अपील द्वारे दुरुस्त करता येईल
कालावधी-१४ जून ते २४ जून २०२२
➡️चौथा टप्पा-
शिक्षणाधिकारी (प्रा.) यांनी शिक्षकांचे appeal तपासून Verify करणे व Accept करण्यासाठी शिक्षकांकडे परत पाठविणे.
कालावधी-१४ जून ते २६ जून २०२२
➡️पाचवा टप्पा-
गटशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांनी Verify केलेले प्रोफाईल शिक्षकांनी Accept करणे.या ठिकाणी शिक्षकांनी एकदा प्रोफाईल Accept केल्यानंतर बदली प्रक्रिया संपेपर्यंत पुन्हा कोणत्याही टप्प्यावर त्यांना माहिती मध्ये बदल करता येणार नाहीत याची नोंद घ्यावी. बदली प्रक्रियेतील हा सर्वात महत्वपूर्ण टप्पा असेल.
कालावधी-१४ जून ते २८ जून २०२२
➡️सहावा टप्पा-
जे शिक्षक जाणीवपूर्वक बदली प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी अथवा बदली टाळण्यासाठी प्रयत्न करतील .जे शिक्षक मुदतीत प्रोफाईल अपडेट करणार नाहीत किंवा वरील टप्प्यांमध्ये सहभागी होणार नाहीत, अश्या शिक्षकांचे प्रोफाईल गटशिक्षणाधिकारी सक्तीच्या स्वीकृतीने (Force Acceptence) Accept करतील.मात्र ज्या शिक्षकांची अशी माहिती सक्तीच्या स्वीकृतीने स्वीकारली जाईल , मग ती चुकीची असल्यास त्याला सर्वस्वी संबंधित शिक्षकाला जबाबदार धरण्यात येईल.मात्र सातव्या टप्प्यात अश्या शिक्षकांच्या माहिती बाबत सोशल अपील करता येईल.अश्या सक्त सूचना आग्रही मागणी वरून संबंधित बदली प्रक्रिया राबविणाऱ्या यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.
कालावधी-२९ जून ते १ जुलै २०२२
➡️सातवा टप्पा-
वरील सर्व ६ टप्पे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे प्रोफाईल Acceptence शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर सर्व शिक्षक इतर सर्व शिक्षकांचे प्रोफाईल पाहू शकतील.चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांवर आक्षेप घ्यायचा असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे Social appeal करता येईल.
कालावधी-२४ जून ते ३ जुलै २०२२
➡️आठवा टप्पा-
शिक्षकांनी केलेल्या Social appeal वर मुख्य कार्यकारी अधिकारी सुनावणी घेऊन निर्णय घेतील.
कालावधी-४ जुलै ते ५ जुलै २०२२
यानंतर खऱ्या अर्थाने बदली प्रक्रियेला सुरवात होईल ....
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments