मुलींनो ग्रॅज्युएट व्हा आणि घ्या केंद्र सरकारकडून लग्नासाठी 51 हजार रुपये ( PM Shadi Shagun Yojana)

 मुलींनो ग्रॅज्युएट व्हा आणि घ्या केंद्र सरकारकडून लग्नासाठी 51 हजार रुपये 

( PM Shadi Shagun Yojana) 

(शादी शगुन योजना) 


केंद्र सरकार (Central government) असो की राज्य सरकारे (state governments), दोघेही आपापल्या स्तरावर विविध योजना राबवतात. यासोबतच अनेक जुन्या योजनांमध्येही बदल करण्यात आले आहेत.


या योजनांचा उद्देश गरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचणे हा आहे. विद्यार्थी, वृद्ध, विधवा, शेतकरी आणि इतरांसाठी सरकार विविध प्रकारच्या योजना राबवते. अशीच एक योजना म्हणजे ‘प्रधानमंत्री शादी शगुन योजना’ (PM Shadi Shagun Yojana) जी केंद्र सरकार देशातील मुलींसाठी राबवत आहे.


मुलींसाठी खुशखबर

वास्तविक, मुलींना लग्नाच्या वेळी कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी त्यांना 51 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. चला तर मग आम्ही तुम्हाला या योजनेबद्दल सांगतो, तुम्ही त्यात अर्ज कसा करू शकता आणि तुम्हाला त्याचे फायदे कसे मिळू शकतात.


मुलींचे लग्न करण्याची विवंचना बऱ्याच गरीब कुटुंबात आढळून येते त्यांना साहाय्य करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने शादी शगुन योजना सुरु केली आहे यामध्ये अल्पसंख्याक समाजातील मुलीने बॅचलर पदवी घेऊन लग्न केले, तर त्या मुलीला 51 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.


या मुली लाभ घेऊ शकतात:-

देशातील अल्पसंख्याकांच्या यादीत येणारी कुटुंबे

ज्या मुस्लिम मुलींना बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आहे. 

ही राष्ट्रीय शिष्यवृत्ती देशातील अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारशी समाजातील मुलींना दिली जाते.


तुम्ही याप्रमाणे अर्ज करू शकता:-

स्टेप 1  

जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम मौलाना आझाद एज्युकेशन फाऊंडेशनच्या अधिकृत वेबसाइट https://www.india.gov.in/ वर जावे लागेल.


स्टेप 2

यानंतर तुम्हाला ‘स्कॉलरशिप’ हा पर्याय निवडावा लागेल. आता तुमच्या समोर एक पेज दिसेल, जिथे तुम्हाला ‘शादी शगुन योजना फॉर्म’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.


स्टेप 3

आता फॉर्म भरा, आणि सर्व आवश्यक कागदपत्रे येथे अपलोड करा. मग शेवटी फॉर्म सबमिट करा आणि नोंदणी स्लिप तुमच्याकडे ठेवा.


आपल्या आधार संलग्न बँक खात्यात मंजूर झाल्यानंतर रक्कम वर्ग केली जाईल.


आताच अर्ज करण्यासाठी.

येथे क्लिक करा


कृपया गरजू गरीब पात्र विद्यार्थिनींनी पर्यंत हा मेसेज जरूर पोहोचवा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.