शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या नाव आडनाव जात पोटजात जन्मतारीख यात बदल करण्याबाबत नियम पद्धती व अर्ज.

 शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या, नाव, आडनाव, जात, पोटजात, जन्मतारीख यात बदल करण्याबाबत नियम, पद्धती व अर्ज.


सर्वसाधारण नोंदवहीत एकदा केलेल्या नंदित यथास्थिती शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई किंवा जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांची लेखी पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय बदल करता येणार नाही.

ज्या ठिकाणी अशी पूर्व मान्यता घेतली असेल त्या ठिकाणी शाळा प्रमुख यांच्या सहीनिशी तांबड्या शाईने मान्यता दिलेला बद्दल नोंदवहीतील व शेजारच्या संघात किंवा योग्य ठिकाणी बदल करण्यास परवानगी दिली अधिकाऱ्याच्या पत्राचा क्रमांक दिनांक नमूद करतील.

सर्वसाधारण नोंदवही तील किंवा अशा स्थिती शाळा सोडल्याच्या प्रमाण पत्रातील नोंदीत बदल करण्यात बाबतचा अर्ज या कारणाकरिता विहित केलेल्या नमुन्यात विद्यार्थी जर अज्ञान असेल तर त्यांच्या तिच्या आई वडिलांनी पालकांनी किंवा विद्यार्थी सज्ञान असेल तर त्यांनी तिने स्वतः ज्या शाळेत विद्यार्थी शिकत असेल त्या शाळेच्या प्रमुख यामार्फत शाळा ज्यांच्या अधिकारी देत येत असेल त्या शिक्षण निरीक्षण मुंबई किंवा यथास्थित संबंधित जिल्हा परिषद शिक्षणाधकारी यांच्याकडे पाठवला पाहिजे.


त्या नियमात तरतूद केलेल्या मर्यादे शिवाय इतर कोणत्याही बाबतीत विद्यार्थी शाळा सोडून गेल्यानंतर शाळेच्या अभिलेखात नोंदवलेल्या जन्मतारखेत बदल करण्यास परवानगी दिली जाणार नाही. आणि सर्वसाधारण नोंदवही तून शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्र नक्कल करताना चूक झाली असेल त्या ठिकाणी शाळा प्रमुख इच्छित बदल प्रमाणपत्रात न करता प्रमाणपत्राच्या मागील बाजूस नोंदविला आणि नोंद वही वर सही करून दिनांक टा तसेच त्याचा शिक्का खबर शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर संबंधित शाळा प्रमुखांनी पृष्ठांकित केलेल्या नोंदीनुसार माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्रात झालेली वर्णन लेखनातील चुका किंवा खरीखुरी चुक दुरुस्त करण्याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ स्वतंत्रपणे विचार करील.

अनुज्ञेय बदल किंवा दुरुस्ती करण्याकरता शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याकडून किंवा ज्यांनी शाळा सोडली आहे अशा विद्यार्थ्याकडून आलेल्या अर्जाबरोबर कोणतीही फी आकारली जाणार नाही. अर्ज पुढे पाठवताना शाळा प्रमुखाने अर्जावरील सही पालकाने आई-वडिलांनी किंवा विद्यार्थी जर सज्ञान असेल तर त्यांनी स्वतः केली असल्याची व अशा अधिकृत व्यक्तीनेच अर्ज केला असल्याची पडताळणी केली पाहिजे.


जन्मतारखेतील बदल. 


या नियमा सोबत जोडलेल्या नमूना क्रमांक एक मध्ये अर्ज सादर केला पाहिजे त्यामध्ये चुकीची नोंद कशी झाली याबाबत स्पष्टपणे स्पष्टीकरण करण्यात यावे.

सुचविलेल्या बदलाच्या पुष्ट्यर्थ खालील कागदोपत्री पुरावा सादर केला पाहिजे.

नोंदवहीतील प्रमाणित उतारा.

लस टोचणी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत.

ख्रिश्चनांच्या बाबतीत बाप्तिस्मा प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत आणि विद्यार्थ्यांच्या खऱ्या जन्मतारीख की बाबत वृत्ती धारी दंडाधिकाऱ्यांसमोर विद्यार्थ्याच्या आईवडिलांनी किंवा पालकांनी केलेले शपथपत्र आणि असल्यास अन्य कोणताही पुरावा.


दाखल केलेला कागदोपत्री पुरावा व त्या मुलाची व आई-वडिलांची स्पष्टपणे ओळख पटवणार असल्याशिवाय आणि खरोखरची चूक झाली आहे याबाबत कोणतीही शंका राहिली नाही अशा स्वरूपाची असल्याशिवाय जन्मतारखेत कोणताही बदल करण्यास मंजुरी देऊ नये. बदल मंजूर करणार्‍या अधिकार्‍यांनी तो मंजूर करण्याची कारणे लेखी नमूद करून ठेवली पाहिजे.


नाव आडनावातील बदल. 


नावातील बदल आन करता अर्ज सोबत पुढील कागदपत्रे पुरावा सादर केला पाहिजे आणि पुढील पुराव्यांची काळजीपूर्वक तपासणी केल्याशिवाय आणि त्याबबत खात्री करून घेतल्याशिवाय कोणताही बदल करण्यास परवानगी दिली जाऊ नये.

दत्त विधानामुळे बदल झाला असेल तर त्याबाबतीत दत्तक पत्राची मूळ प्रत किंवा च्या दत्तक प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत किंवा दत्त विधानामुळे नावांमध्ये बदल झाला आहे हे दर्शवणारे वृत्ती धारी दंड अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.

विवाहामुळे बदल झाला असेल तर आई-वडिलांची किंवा पालकांची किंवा मुलींचे स्वतःची दोन साक्षीदारांनी साक्षांकित केलेले प्रतिज्ञापत्र किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत.

अन्य सर्व बाबतीत आईवडिलांनी किंवा पालकांनी वृत्तीदारी दंडाधिकार्‍यापुढे केलेले शपथपत्र.


सार्वजनिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत नावातील बदल मंजूर झाला असल्यास त्यांनी तिने आपल्या नावातील बदल महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात अधिसूचित करणे आवश्यक आहे मात्र विवाहामुळे नावात झालेला बदल महाराष्ट्र शासनाच्या पत्रात अनुसूचित करणे आवश्यक नाही.


जात किंवा पोटजात यामधील बदल. 

( केवळ मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत) 


मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जातीत किंवा पुढे जातील बदल करण्याकरता विद्यार्थ्यांच्या पालकांनी या नियमा सोबत जोडलेल्या नमुना तीन मध्ये अर्ज केला पाहिजे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शाळेतील सर्वसाधारण नोंदवहीतील जात किंवा पोटजात याबाबतीत नोंदीत पुढील परिस्थितीत बदल करण्यास परवानगी देता येईल.

सुरुवातीला चुकीची नोंद केल्यामुळे.

धर्मात बदल झाल्यामुळे.

कोणती जात पूर्वी मागासवर्गीय तर म्हणून समजले जात असेल पण नंतर ती शासनाने मागासवर्गीय म्हणून घोषित केल्यामुळे किंवा याउलट झाल्यामुळे.

दत्त विधानामुळे.

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह यामुळे.

अन्य कोणत्याही कारणामुळे.


या प्रयोजनासाठी जातीतील किंवा पोट जातीतील बदल करण्यासाठी करावयाच्या अर्जासोबत पुढील प्राधिकारणी दिलेले आवश्यक ते प्रमाणपत्र दाखल केली पाहिजे.


मुख्य इलाखा दंडाधिकारी किंवा त्याने प्राधिकृत केलेला इलाखा दंडाधिकारी किंवा जस्टिस ऑफ पीस किंवा समाज कल्याण अधिकारी बृहन्मुंबई मुंबई.


जिल्हा दंडाधिकारी किंवा यांनी प्राधिकृत केलेले कार्यकारी दंडाधिकारी किंवा मानसेवी दंडाधिकारी किंवा संबंधित जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी.


दत्त विधानामुळे जातील किंवा पोट जातीतील बदल करून घेण्याकरता करावयाच्या अर्जासोबत तर पत्राची मूळ प्रत किंवा त्या दत्तक पत्राची प्रमाणित किंवा दत्तक विधानामुळे नावात कोणताही असल्यास आणि जातील किंवा पुढे जातील झालेला बदल दर्शवणारे वृत्तीधारी दंडाधिकारी च प्रमाणपत्र घेतले पाहिजे. 

आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहामुळे जातीतील किंवा पोट जातीतील बदल करून घेण्याकरता करावयाचा अर्ज सोबत आई-वडिलांची काम पालकांची आणि स्वतः विद्यार्थ्यांची किंवा विद्यार्थिनीचे 21 साक्षीदारांनी साक्षांकित केलेले प्रतिज्ञापत्र किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रमाणित प्रत आणि विवाहामुळे जातीच्या व पोटजातीच्या बदल झाला आहे हे दर्शवणारे वरील मध्ये नमूद केलेल्या संबंधित सक्षम अधिकार्‍याचे प्रमाणपत्र जोडले पाहिजे. 




 नियमांची पीडीएफ स्वरूपात प्रत डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


नाव, जात, पोटजात, जन्मतारीख बदल करण्यासाठी करावयाच्या अर्जाची प्रत डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.