बदली अपडेट
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत ग्रामविकास विभागाचे दिनांक 23 जून 2022 चे पत्र.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दिनांक सात एप्रिल 2021 च्या दोन स्वतंत्र शासन निर्णय सुधारित धोरण विहित करण्यात आले सदर धोरणातील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत बदली पात्र असलेल्या विशेष संवर्ग भाग एक मधील विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांची यादी निव्वळ रिक्त पदांची यादी संभाव्य रिक्त पदांची यादी जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे इत्यादी वेळोवेळी आपणास शासनस्तरावर निर्देश देण्यात आलेले आहेत.
Covid-19 आजाराच्या कारणास्तव बऱ्याच जिल्हा परिषद यांचे पोस्टरची बिंदु नामावली विभागीय आयुक्त मागासवर्ग कक्ष यांच्याकडून तपासणी झालेली नसल्यास त्यामुळे संदर्भीय शासन निर्णयातील तरतुदीनुसार या वर्षीच्या आंतरजिल्हा बदल्या साखळी पद्धतीने कराव्यात किंवा विभागीय आयुक्त मागासवर्गीय पक्ष यांच्याकडून यापूर्वी गोष्ट ची तपासणी करून घेतली असल्यास त्यानुसार सदर बदल्या कराव्यात याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी निर्णय घ्यावा असे आपणास दिनांक 10 जून 2022 च्या पत्रान्वये कळविले आहे.
आंतरजिल्हा बदली प्रक्रिया लवकरच सुरू होणार!
तरी वरील परिच्छेद मध्ये नमूद केलेली आवश्यक ती आपल्या जिल्ह्याची अद्यावत स्वाक्षरीत बिंदू नामावली विन्सेस आयटी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना दिनांक 28 जून 2022 पूर्वी उपलब्ध करून द्यावी सदर बाब आंतरजिल्हा बदलीसाठी अत्यावश्यक असल्याने विलंब कटाक्षाने टाळावा.
अशा सूचना ग्रामविकास विभागाच्या या शासन निर्णयान्वये सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना करण्यात आल्या आहेत.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments