ऑनलाइन शिक्षक बदली पोर्टलवर प्रोफाइल अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे आपली प्रोफाइल अपडेट करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
ओपन झालेले विंडोमध्ये आपला मोबाईल नंबर टाका सेंड ओटीपी वर क्लिक करा आलेला ओटीपी टाकून त्यानंतर कॅपच्या कोड टाका व लॉगिन करा.
लगीन झाल्यानंतर बाजूच्या तीन रेषांवर क्लिक करून प्रोफाईलवर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या प्रोफाईल मधील माहिती दिसेल नेक्स्ट वर क्लिक करून शेवटी सबमिट वर क्लिक करा.
अर्थात सध्या तरी बदली प्रक्रिया अमरावती जिल्ह्यासाठी सुरु आहे
बदली पोर्टल अपडेट
बदली पोर्टल वर आजच बदली पात्र व बदली अपात्र सर्वांनी पूर्ण करावयाची महत्त्वाची प्रक्रिया.
बदली पोर्टल वर जा आपला मोबाईल नंबर अचूकपणे नोंदवा सेंड ओटीपी वर क्लिक करा जर आपणास ओटीपी प्राप्त झाला तर चिंता करण्याचे कारण नाही ओटीपी दिलेल्या ठिकाणी भरा कॅपच्या कोड अचूक नोंदवा व आपली प्रोफाईल मध्ये लॉगिन करा.
वरील प्रोसेस जर झाली नाही ही सुरुवातीलाच ओटीपी आली नसल्यास आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून आपला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी पोर्टलवर योग्यरीत्या नोंदवला आहे की नाही याची खात्री आजच करायची आहे.
जर आपणास आपल्या ईमेलवर अथवा मोबाईल नंबर वर ओटीपी प्राप्त होत नसेल याच अर्थ असा की आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी योग्यरीत्या पोर्टलवर नोंदवल्या गेला नाही तो शिक्षणाधिकारी कार्यालयातून दुरुस्त करणे आवश्यक आहे.
जोपर्यंत आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी योग्यरीत्या पोर्टलवर नोंदवला जात नाही तोपर्यंत आपण आपली प्रोफाइल लोगिन करू शकणार नाही.
त्यामुळे आजच आपण टीचर ट्रान्सफर पोर्टल वर जाऊन आपला मोबाईल नंबर टाकून लॉगिन करून पाहायचे आहे यामध्ये काही अडचण आल्यास गटशिक्षणाधिकारी अथवा शिक्षणाधिकारी कार्यालयात संपर्क साधून आपला ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर योग्यरीत्या पोर्टलवर नोंदवून घ्यायचा आहे.
कारण उद्यापासून म्हणजेच दिनांक 13 जून 2022 पासून आपल्याला आपली प्रोफाइल अपडेट करण्यासाठी ची सुविधा उपलब्ध होणार आहे.
पोर्टल ची लिंक👇
जर आपणास ओटीपी प्राप्त होऊन लॉगीन झाले असेल तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही उद्या दिनांक 13 जून 2022 रोजी पासून 23 जून 2022 पर्यंत आपण आपले प्रोफाइल केव्हाही अपडेट करू शकता.
👉🏻 Profile Update ची सुविधा सुरू झाली आहे. परंतु जोपर्यंत अधिकृत सूचना मिळत नाहीत तोपर्यंत कोणीही माहितीत बदल करू नये. तशा अधिकृत सूचना शिक्षण विभागाकडून आपणास मिळतील किंवा वेळापत्रक प्रकाशित होईल.
👉🏻 सदर पोर्टल नव्यानेच असल्याने व एकाच वेळी अनेक शिक्षक पोर्टलला भेट देत असल्याने सुरुवातीला काही अडचणी येणे संभव आहे.
👉🏻 आतापर्यंत अनेकजणांना लॉगिन करताना सुरूवातीला OTP प्रॉब्लेम येत आहे. तो दूर झाला आहे. तरीही मोबाईलवर OTP येत नसेल तर दिलेल्या मेल आयडी मधील inbox किंवा spam फोल्डर चेक करावे.
👉🏻 आतापर्यंत जवळपास ८१ हजार शिक्षकांनी पोर्टल ला भेट दिली आहे. पैकी ३५ हजार शिक्षकांनी आपली सेवा विषयक माहिती अपडेट केली आहे. असे महितीद्वारे कळाले आहे.
👉🏻 १३ ते २२ जून पर्यंत माहिती अपडेट करता येईल. त्यावेळी पूर्ण क्षमतेने सदर साईट सुरू राहील.
-#-#-#-#-#-#-#-#-#-#
🤔 प्रोफाईल अपडेट कोणी करायची ?
👉🏻 बदली पात्र असो वा नसो प्रत्येक शिक्षकाने म्हणजे 100% शिक्षकाने पडताळून पाहणे आवश्यक आहे. आपली सेवा विषयक माहिती अपडेट केल्यावर गटशिक्षणाधिकारी स्तरावरून पुन्हा पडताळणी होणार आहे.
👉🏻 माहिती अपडेट करणे म्हणजे आपली बदली होणारच असे कदापीही नाही.
#-#-#-#-#-#-#-#-#
📲 बदली पोर्टलला लॉगीन कसे करावे ?
👉🏻 बदली पोर्टलला लॉगीन केल्यानंतर काही सूचना वाचायच्या आहेत. आणि Accept करा.
👉🏻 बाजूला Profile दिसते. त्यावर Click करा.
👉🏻 Profile दोन पेज मध्ये आहे. Personal Details व Employment Details.
👉🏻 profile अपडेट करण्याची सुविधा दि. 13-06-2022 ते 22-06-2022 पर्यंत आहे, असे कळते.
👉🏻 Personal Details मधील माहिती आपल्याला बदलवता येणार नाही.
👉🏻 Employment Details मधील माहिती ही प्रत्येकाने चेक करुन अचूक भरावयाची आहे. तरी काळजीपूर्वक भरा. यासाठी शक्य होत असल्यास जवळील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.
👉🏻 Date of Apponitment- यामध्ये सेवेत रुजू दिनांक भरावयाचा आहे. ऑर्डर वरील दिनांक भरू नये. प्रत्यक्ष शाळेवरील रुजू दिनांक भरावा.
👉🏻 Cast category - ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा. आपल्या मूळ नियूक्ती आदेशावर दिलेली आहे.
👉🏻Appointment category- ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा.
👉🏻 Current District Joining Date- यामध्ये सेवेत रुजू दिनांक भरावयाचा आहे. ऑर्डर वरील दिनांक भरू नये. आंतरजिल्हा बदली शिक्षकांनी या जिल्ह्यातील रुजू दिनांक भरावा.
👉🏻 Udise Code of Current School कार्यरत शाळेचा युडायस नंबर चेक करुनच भरावा. Current School Joining Date- यामध्ये सध्याच्या कार्यरत शाळेतील रुजू दिनांक भरावयाचा आहे. ऑर्डर वरील दिनांक भरू नये.
👉🏻 Current Teacher Type Graduate / Under Graduate / Headmaster यापैकी ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा.
👉🏻 Teaching Subtype- यामध्ये Graduate Teacher असेल त्यांनी भाषा / गणित-विज्ञान / समाजशास्त्र यापैकी सिलेक्ट करा. इतरांनी Not Avaible हे ऑप्शन निवडा.
👉🏻 Teaching medium या मध्ये Marathi निवडा.
👉🏻 Last Transfer Category - सध्याच्या शाळेत आपण कोणत्या संवर्गातून बदली होवून आलात तो संवर्ग ड्रॉप डाउन मधून सिलेक्ट करा.
👉🏻 Last Transfer Type - सध्याच्या शाळेत आपण आंतरजिल्हा की जिल्हांतर्गत बदली होवून आलात तो प्रकार ड्रॉप लिस्ट मधून सिलेक्ट करा लागून नसल्यास N/A सिलेक्ट करा.
#-#-#-#-#-#-#-#-#
📍📌🪂 बदली पोर्टल संदर्भात माहिती ही माझ्या सद्सद्विवेक बुद्धीने, प्राप्त माहितीआधारे आपणास मदत व्हावी म्हणून दिली आहे. सर्व सूचना प्रशासनाच्या अंतिम राहील.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments