संपूर्ण डिजिटल शिक्षण व्यवस्थेकडे (माझ्या कल्पनेतली परिपूर्ण डिजिटल शाळा!)

 माझ्या कल्पनेतली परिपूर्ण डिजिटल शाळा! 


शाळेत अँड्रॉइड टीव्ही लावला म्हणजे शाळा डिजिटल झाली? 

शाळेत इंटरॅक्टिवे बोर्ड प्रोजेक्टर लावला म्हणजे शाळा डिजिटल झाली? 

शाळेत कम्प्युटर आले म्हणजे शाळा डिजिटल झाली? 

शाळेत इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाली म्हणजे शाळा डिजिटल झाली? 

शाळेत वरील सर्व सुविधा उपलब्ध झाल्या म्हणजे शाळा डिजिटल झाली? 

सर्व साधने वापरली म्हणजे संपूर्ण डिजिटल शाळा झाली का? 

माझ्या दृष्टिकोनातून वरील सर्व प्रश्नांची उत्तरे नाही ही आहे. जर शाळा संपूर्ण डिजिटल करायचे असेल तर शाळेत असलेली कोणतेही कागद वापरलेलं पुस्तक वापरण्याची गरज उरणार नाही.

यापुढे जाऊन मी असेही म्हणेल की शाळेत प्रिंटरची देखील गरज असणार नाही प्रिंटरमधून कागद टाकून त्याची प्रिंट बाहेर करण्याची गरज नाही जे काही काही करायचे आहे ते डिजिटल आणि व्हर्च्युअल असे असेल.

पुस्तके डिजिटल स्वरूपात शाळेतील डिवाइस मध्ये असतील आणि त्याच डिव्हाइस मधून विद्यार्थी पुस्तक वाचतील अभ्यास देखील त्याच डिवाइस मध्ये वर व्हर्च्युअल पद्धतीने किंवा डिजिटली करतील त्यांना वहीत लिहायची गरज नसेल. टच स्क्रीन वापरून किंवा टच पॅड वापरून विद्यार्थी त्यांच्या हस्ताक्षरात त्यांच्या डिवाइस मध्ये त्यांची स्वाध्याय वही सेव्ह करतील व शिक्षकांना पाठवून शिक्षक डिजिटल स्वरूपातील वही तपासतील.

जर आपण संपूर्णपणे कागद वापरणे बंद केले तर कागद वापरामुळे होणारी वृक्षतोड कमीत कमी होईल व आपण पर्यावरणाचे संरक्षण करू शकू.

प्रायोगिक तत्त्वावर तरी असे करून पाहणे गरजेचे आहे.

अर्थात आपण ही ही गोष्ट शिक्षकांसाठी लागू केली आहे त्यांचं ट्रेनिंग हे ऑनलाईनच होते Mooc ही इंग्रजीतील संकल्पना शिक्षकांसाठी लागू आहे.

डिजिटल स्वरूपातील पीडीएफ पुस्तक हे स्वतः महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद सर्वांसाठी उपलब्ध करून देते तीच पुस्तके वापरून पुस्तके छापण्याचा शासनाचा खर्चही यातून आपण वाचवू शकतो. 

जवळपास सर्व शाळा अंशतः डिजिटल झाल्या आहे हळूहळू त्या पूर्णतः आपल्या संकल्पनेनुसार डिजिटल देखील करता येतील.

जवळपास सर्व पालकांकडे स्मार्टफोन उपलब्ध आहे आता अगदी क्वचितच लोकांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाही. त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था पुस्तक छपाई पासून पैशातून करता येईल.

वहीत लिहिलेले काही दिवसात खराब होते कागद फाटतो वही खराब होते फाटते परंतु डिजिटल स्वरूपात टच बोर्डवर लिहिलेले किंवा टाईप केलेले फाईल स्वरूपात आंतरजालावर जर सेव करून ठेवले तर विद्यार्थ्याला आपण पहिल्या वर्गात पहिला धडा शिकल्यानंतर केलेला अभ्यास त्याच्या ड्राइवर तो म्हातारा झाल्यावर ही जसाचा तसा पाहता येईल.

प्रश्न पुरतो प्राथमिक शाळेतील विद्यार्थी थी ही डिजिटल साधने कसा वापरेल परंतु आपण त्यांना वही पुस्तक पेन्सिल पेन जसे वापरण्यास शिकवतो तसेच ही साधने देखील वापरणे शिकवू शकतो असा माझा समज आहे.

यासाठी आवश्यक अत्याधुनिक साधने लागतील इंटरनेटचे सुपर फास्ट कनेक्शन लागेल असे काही जण म्हणतील परंतु ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ज्या ठिकाणी उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी काही कालावधीत ते उपलब्ध होतील.

म्हणून आपण प्रयोगिक तत्वावर का होईना सदर गोष्ट करण्यास सुरुवात करायला हवी.

Covid-19 काळात आपण अनुभव घेतला सुरुवातीला सर्व  डिजिटल साधने उपलब्ध होतील का? विद्यार्थी वापरतील का? हे प्रश्न आपल्यासमोर होते परंतु लगेच काही कालावधीनंतर विद्यार्थी सर्रासपणे ही साधने अतिशय कौशल्यपूर्ण वापरायला लागली व आता तर मोठ्या झालेल्या विद्यार्थ्यांना पुण्यात जाऊन तिथे राहून क्लास करण्याची गरज उरली नाही तर ती क्लासेस विद्यार्थी घरी बसून कोणत्याही शहरात ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करत आहेत परंतु आपल्याला शाळा ही व्यवस्था मोडायची नाही शाळा या व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांची सामाजिकीकरण होण्यास मदत होते त्यामुळे ती अनिवार्य आहे विद्यार्थ्यांना शाळेतच बोलवून मात्र त्यांना खडू-फळा पेन्सिल वही पेन पुस्तक जड दप्तर या सगळ्यांपासून वेगळी करून संपूर्ण डिजिटल व्हर्च्युअल शिक्षण देण्यासाठी पावले उचलणे ही काळाची गरज झाली आहे.


संपूर्ण व्हर्च्युअल/डिजिटल शिक्षणाचे स्वरूप कसे असेल.

विद्यार्थी शाळेत येतांना फक्त त्याची टिफिन बॅग घेऊन येईल.
त्याला पुस्तक वह्या दप्तर या सर्व गोष्टी खाण्याची गरज नसेल.
शाळेत आल्यावर वर्गात त्याच्या स्वतंत्र टेबलवर त्याचा स्वतंत्र असा पीसी/लॅपटॉप/टॅब व इतर आवश्यक उपकरणे इंटरनेट जोडणी सह शिक्षकाच्या पीसी ला जोडलेले असतील. 
विद्यार्थी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवताना समोरा समोर बसलेले असतील शिकवण्याचा भाग शिक्षक त्यांच्या पीसी वरून सर्व विद्यार्थ्यांच्या उपकरणांवर ओपन करतील व त्यांना सदर संकल्पना पाठ्यक्रम समजावून सांगतील गरज भासल्यास वैयक्तिक लक्ष देऊन प्रत्येकाला समजून सांगतील व स्वाध्याय देतील.
विद्यार्थ्यांची उपकरण हे असे प्रोग्राम केले असेल की त्यामध्ये त्या वर्गाच्या विक्रमा व्यतिरिक्त कोणतीही फाइल उपलब्ध नसेल होऊ शकणार नाही व विद्यार्थी फक्त त्यांचा स्वाध्याय पूर्ण करतील अशी सुविधा उपलब्ध असेल. विद्यार्थी शिक्षक यांच्या उपकरणांमध्ये असलेले अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर ऑनलाइन देखील काम करेल आणि विद्यार्थी त्यांना दिलेल्या लॉग इन आयडी व पासवर्ड वरून त्यांच्या घरी उपलब्ध असलेल्या उपकरणामध्ये त्यांचा घरचा अभ्यास पूर्ण करू शकततील व तो अभ्यास पूर्ण केला किंवा नाही हे शिक्षक शाळेत आल्यानंतर किंवा केव्हाही त्यांनी त्यांच्या पीसीवर लॉग इन केल्या बरोबर त्यांच्या लक्षात येईल व त्यांनी पूर्ण केलेला स्वाध्याय तपासतील.
बऱ्याच गोष्टी व्हिडिओ दृक श्राव्य स्वरूपात विद्यार्थी की समजून घेऊ शकतील गरज भासल्यास विज्ञान प्रयोग शाळेत जाऊन प्रयोग करतील. प्रत्येक विषयाच्या स्वतंत्र कक्षात कृतीयुक्त अध्ययन करतील.


वरील कल्पनेत अजून काही ही सुधारणा आपण सुचवू शकता.
मी देखील अजून विचार करत आहे. सुचल्यास अजून अपडेट करेल.





नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.