शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून इयत्ता पहिली ते बारावी चा पाठ्यक्रम 100% राबविणेबाबत शासन निर्णय.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 24 जून 2022 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून इयत्ता पहिली ते बारावी चा पाठ्यक्रम 100% राबविणेबाबत शासन निर्णय पुढील प्रमाणे.
मार्च दोन हजार वीस पासून covid-19 च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा ऑनलाइन स्वरूपामध्ये सुरू होत्या तसेच शाळेत अध्ययन-अध्यापन मर्यादित स्वरूपात होत असल्याने या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांवरील अध्ययनाचा ताण कमी व्हावा या दृष्टीने शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता पहिली ते बारावी चा पाठ्यक्रम 25 टक्के कमी करण्यात आला होता तसेच covid-19 आपत्कालीन परिस्थिती कायम राहिल्याने सदर कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम सन 2021 22 या शैक्षणिक वर्षात कायम ठेवण्यात आला होता.
परंतु आता कोविड-19 संदर्भातील सर्व नियम शिथिल करण्यात आल्यामुळे शैक्षणिक वर्ष 2022 23 पासून इयत्ता पहिली ते बारावी साठी शंभर टक्के पाठ्यक्रम लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. याबाबत संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी शाळा विद्यार्थ्यांना तसेच पालकांना अवगत होण्यासाठी त्यांच्या वेबसाईटवर तसेच इतर माध्यमातून द्वारे योग्य ती प्रसिद्धी देण्यासंदर्भात निर्देश सदर शासन निर्णयात देण्यात आले आहे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments