वस्तीशाळा शिक्षकांची 2002 पासुन ची सेवा ग्राह्य धरणेबाबत ग्रामविकास विभागाचे पत्र.
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ या संघटनेच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने वस्तीशाळा शिक्षकांची 2002 पासून ची जुनी सेवा ग्राह्य धरून त्यांना चटोपाध्याय व निवड वेतनश्रेणीचा लाभ मिळणे बाबत एक पत्र निर्गमित केली आहे.
सदर पत्रानुसार राज्यातील वाड्या वस्तीत आणले पाड्यावरील आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी वस्तीशाळा शिक्षकांची सन 2001 पासून सेवा ग्राह्य धरण्याबाबत तसेच त्यांना ना ही सेवा ग्राह्य धरून चटोपाध्याय आहे व निवड श्रेणीचा लाभ देण्याची विनंती संघटनेचे अध्यक्ष श्री अरुण जाधव यांनी केली आहे.
त्यासाठी ग्रामविकास विभागाने पत्र काढून प्रस्तुत प्रकरणाच्या अनुसंधान जिल्हा परिषद घेऊन अहवाल मागून प्रस्तावास सह शासनाला ई-मेल करण्याच्या सूचना सर्व विभागाच्या विभागीय आयुक्त यांना केल्या आहेत.
2001 पासून राज्याच्या वड्या वस्तीत आणि पाड्यावरील मुलांना शिकवण्यासाठी ज्या ठिकाणी नियमित शाळा उपलब्ध नाही अशा ठिकाणी वस्तीशाळा सुरू केल्या होत्या व त्या ठिकाणी मानधन तत्वावर स्थानिक स्वयंसेवक/ शिक्षक नेमले होते.
त्यानंतर 2008-2009 मध्ये या शाळांमध्ये पात्र वस्ती शाळांचे नियमित शाळेत रूपांतर करण्यात आले व अशा शाळांना नियमित शिक्षक व इतर शाळा प्रमाणे सोयी सुविधा देण्यात आल्या तिया शाळेवरील पूर्वीच्या शिक्षकांना त्यात किंवा इतर दुसऱ्या शाळेवर निमशिक्षक म्हणून मानधन तत्वावर व करारावर नियुक्ती देण्यात आली. या शिक्षकांना डीएड करण्याची संधी उपलब्ध करून देऊन त्यांचे अध्यापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यात आला.
सन 2014 मध्ये त्यांना नियमित शिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले.
2002 पासून 2014 पर्यंत सदर शिक्षकांनी कंत्राटी तत्वावर वस्तीशाळा व नंतर रूपांतरित जिल्हा परिषद शाळा तिथे शिक्षक म्हणून काम केले हा कालावधी त्यांचा सेवा कालावधी म्हणून पकडण्यात यावा अशी विनंती शासनाकडे करण्यात आली आहे व या बाबतचा अहवाल ग्राम विकास विभागाने विभागीय आयुक्त मार्फत मागविला आहे.
अर्थात असा शासन आदेश हा अहवाल शासनाला प्राप्त झाल्यानंतर निघू शकतो.
जर वस्तीशाळा शिक्षकांची सेवा 2002 पासून पकडण्यात आली तर त्यांना सन 2014 ला चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू होते की ज्या वर्षी ते शासन सेवेत नियमित म्हणून घेण्यात आले होते. व 2026 ला ते निवड श्रेणी साठी देखील पात्र ठरतील.
जर शासनाने वस्तीशाळा शिक्षकांची सेवा 2002 पासून ग्राह्य धरली तर त्यांना 2005 अगोदरची जुनी पेन्शन देखील शासनाला लागू करावी लागेल.
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments