आजच्या निघालेल्या बदली स्थगिती पत्रक बाबत...
आजच्या बदल्या बाबत शासन निर्णयाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या संदर्भात संभ्रम निर्माण केला आहे सदर संभ्रम दूर करण्यासाठी साठी चौकशी व चर्चा केली असता पुढील निष्कर्ष समोर येतो.
सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या निर्णयात संदर्भित शासन अधिनियम आहे तो शासन अधिनियम जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी लागू होत नाही त्यामुळे सदर पत्रक हे सामान्य प्रशासन विभागाच्या बदल्यांशी निगडित आहे.
सामान्य प्रशासन मार्फत ज्या दरवर्षी प्रशासकीय बदल्या केल्या जातात त्या करण्यात येऊ नये यासाठी आहे.
शिक्षक यांच्या बदल्या ह्या ग्रामविकास विभाग मार्फत होत असतात त्यामुळे या पत्राचा आपल्या बदली प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही.
सदर बदली स्थगिती पत्रक निघण्याचे कारण म्हणजे राज्यात विधानपरिषद आणि देशात राज्यसभा निवडणूक जाहीर झाली आहे,नियमित बदली प्रक्रियेमुळे त्यात कुठला अडथळा येऊ नये म्हणून सदर नियमित बदली प्रक्रियेला ३० जून पर्यंत स्थगिती आहे.
आपल्या म्हणजे शिक्षक संवर्गाच्या बदली प्रक्रियेवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही, त्यामुळे सर्वांनी काळजी करण्याचे कुठलेही कारण नाही.
आपल्या बदल्या ह्या होतीलच...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल यासंदर्भात व्हिडिओ मार्गदर्शन.
जिल्हा परिषद शिक्षक ऑनलाइन बदली प्रक्रिया 2022 बद्दल नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments