समुपदेशनाद्वारे गट क मधील कर्मचाऱ्यांच्या बदली बाबत ची मार्गदर्शक तत्त्वं संदर्भातला शासन आदेश

 समुपदेशनाद्वारे गट क मधील कर्मचाऱ्यांच्या बदली बाबत ची मार्गदर्शक तत्त्वं संदर्भातला शासन आदेश.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग दिनांक 9 एप्रिल 2018 रोजी शासन निर्णय निर्गमित करुन महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 नुसार समुपदेशनाद्वारे बदली बाबतचे धोरण ठरविले आहे.

बदली अधिनियम 2005 नुसार शासकीय अधिकारी कर्मचारी यांची एकाच पदावरील कामकाजात तीन वर्षाचा सामान्य कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांची सर्वसाधारण बदली करण्यात येते की बदली संदर्भात नागरी सेवा मंडळाच्या शिफारशींवर बदली प्रक्रियेच्या अधिकाऱ्याच्या मान्यतेने पदस्थापना चे आदेश निर्गमित करण्यात येतात तथापि या प्रक्रियेत संबंधित बदलीपात्र कर्मचाऱ्यांची वैयक्तिक पसंती अडचणी विचारात घेतली जात नाही परिणामी बदलीनंतर कोणत्याही ठिकाणी पदस्थापना मिळेल याबाबत बदलीचे आदेश प्राप्त होईपर्यंत संबंधित कर्मचारी पूर्णतः अनभिज्ञ राहतो सबब सदर प्रक्रिया अधिक पारदर्शक करणे व या प्रक्रियेत बदलीपात्र कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेणे या उद्देशाने नागरी सेवा मंडळाने पदस्थापना संदर्भात शिफारशी करताना समुपदेशनाने कार्यवाही करण्याकरता मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

यामधून मंत्रालयीन संवर्ग व राज्य शासकीय गट मधील अधिकारी वगळलेले आहेत.

राज्य शासकीय गट ब मधील अधिकारी तसेच गट-क व गट-ड मधील कर्मचारी यांना समुपदेशनाद्वारे बदलीचे धोरण लागू आहे.

प्रतिवर्षी बदली अधिनियमानुसार एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये सेवेचा पदावधी पूर्ण केलेल्या शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्या समुपदेशनाच्या धोरणानुसार करण्यात येतात.

मुदतपूर्व व मध्यवर्ती बदल्या या प्रामुख्याने प्रशासनाची निकड किंवा कर्मचाऱ्याकडून प्राप्त विनंती अर्ज ह्या कारणास्तव वर्षभर चालू राहणारी प्रक्रिया आहे तसेच अशा स्वरूपाच्या बदल्या करताना प्रशासनाची निकड ही एखादी ठराविक रिक्त पदे भरणे अशा स्वरूपाची असल्यामुळे अशा बदलीसाठी समुपदेशनाची आवश्यकता राहत नाही त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या विनंती बदलीसाठी ची मागणी एका ठराविक ठिकाणी बदलीसाठी असल्यामुळे सदर ठिकाणी पद रिक्त असेल तर संबंधित याचा अर्जाचा विचार करण्यात येतो. अन्यथा विनंती अर्ज विचारात घेता येऊ शकत नाही त्यामुळे अशा बदलीसाठी समुद्र कशाची आवश्यकता राहत नाही सबब मुदतपूर्व मध्यावधी बदल्या या समुपदेशनाच्या धोरणानुसार करण्यात येत नाही.

सदर शासन निर्णयाच्या परिशिष्ट एक मध्ये समुपदेशनाद्वारे गट क मधील कर्मचाऱ्यांच्या बदली बाबत ची मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यात आली आहे ती पुढीलप्रमाणे.

वरील सर्व परिशिष्ट यांसह सपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.