आता शासकीय वाचनालये देखील होणार डिजिटल आणि आधुनिक - शासन निर्णय.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढलेल्या शासन आदेशानुसार आता शासकीय विभागीय ग्रंथालय हे आधुनिक आणि डिजिटल होणार आहे. शासकीय विभागीय ग्रंथालय मध्ये उपलब्ध ग्रंथ साहित्य पुस्तके हे मोबाईल ॲप मधून देखील वाचकांना वाचता येणार आहे. व हे सर्व करण्यासाठी या शासन निर्णयानुसार आर शासनाने निधी देखील उपलब्ध करून दिला आहे.
वाचन प्रेमींसाठी ही बाब अतिशय आनंददायी आहे त्यांना आता त्यांना पुस्तके वाचण्यासाठी प्रत्यक्ष ग्रंथालयात जाण्याची गरज नाही त्यांच्या मोबाईल, लॅपटॉप, बुक रीडर वरून ऑनलाईन कोणतेही पुस्तक केव्हाही कुठेही त्यांना वाचता येणार आहे.
अर्थात ग्रंथालयात जाऊन आपण एक किंवा दोन पुस्तके घेऊन ती सोबत बाळगून वाचत होतो परंतु आता तसे न करता अनेक पुस्तके वाचकांना केव्हाही कुठेही गरज असेल तेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा आपल्या मोबाईलवर ऑनलाइन वाचता येणार आहेत.
राष्ट्रीय स्तरावर या अगोदरच नॅशनल डिजिटल लायब्ररी हे पोर्टल उपलब्ध आहे यावर देखील आपण अनेक पुस्तके वाचू शकतो. परंतु मराठी पुस्तके सदर पोर्टल वर पाहिजे तितक्या प्रमाणात उपलब्ध नाही जर अशाच प्रकारे महाराष्ट्रातील सर्व शासकीय लायब्ररी मधील सर्व पुस्तके डिजिटल स्वरुपात उपलब्ध झाली तर ती पुस्तके देखील चिरकाल टिकतील व वाचकांना सदर पुस्तके केव्हाही कोठेही ही डिजिटल स्वरूपात वाचता येतील.
लायब्ररीतील पुस्तके वाचतांना नियोजन करताना जतन करताना सदर पुस्तके फाटतात खराब होतात किंवा खूप वर्षाची पुस्तके सदर कागद खराब झाल्यामुळे वाचता देखील येत नाहीत परंतु डिजिटल पुस्तकांचे मात्र तसे नाही ते वाचतांना खराब होणार नाहीत फाटणार नाही आणि ते चिरकाल टिकणारे असतील.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments