दिव्यांग विद्यार्थी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्याचा मार्ग मोकळा - शासन आदेश.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 30 मे 2022 रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेची प्रोसेसिंग ची मागणी नुसार शारीरिक दृष्ट्या अपंगांना शिष्यवृत्त्या व उद्योगातील प्रशिक्षण कार्यक्रम विद्यावेतन या लेखाशिर्ष खाली टाकण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या शालांत परीक्षेचे उत्तर मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना डीबीटी प्रणालीद्वारे राबवण्यात येत असून शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच सदर डीबीटी प्रणाली च्या विकसनाचे काम महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळामार्फत करण्यास संदर्भातील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.
या योजनेसाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन फॉर्म भरून घेणे जिल्हा कार्यालयाकडून फार्मची पडताळणी व तपासणी करून मंजुरी अंती देका साठी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या लोगिन वर फॉरवर्ड होणे देयके पारित होणे व लाभार्थ्याच्या खात्यामध्ये शिष्यवृत्तीचा लाभ जमा होणे या प्रक्रियेसाठी महाआयटी कडून प्रोसेसिंग फी आकारण्यात येते तथापि सद्यस्थितीत प्रोसेसिंग फी अदा करण्यासाठी कोणतेही लेखाशिर्ष उपलब्ध नव्हते यामुळे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली नव्हती परंतु या शासन निर्णयाद्वारे दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना पोर्टल मार्फत राबवण्यात साठी आकारण्यात येणारी प्रोसेस सी ची मागण शिष्यवृत्त्या व विद्यावेतन या लेखा शिर्षकाखाली खर्ची टाकण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा अंतर्गत त्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments