मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय 30 जून 2022 पर्यंत कोणत्याही बदल्या न करणेबाबत शासन निर्णय.
आज दिनांक 27 मे 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार सन 2022-23 आर्थिक वर्षात दिनांक 30 जून 2022 पर्यंत कोणत्याही बदल्यांना करणेबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे यानुसार शासन आदेशानुसार महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या निश्चित ासन निर्णय निर्गमित केला आहे यानुसार शासन आदेशानुसार महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 नुसार करण्यात येणाऱ्या बदल्या सन दोन हजार बावीस तेवीस या चालू आर्थिक वर्ष की दिनांक 30 जून 2022 पर्यंत करण्यात येऊ नये सरकारी प्रशासकीय कारणास्तव तातडीने एखादी बदली करणे आवश्यक असल्यास अशी बदली माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या मान्यतेने करावी असे स्पष्ट निर्देश सदर शासन निर्णयानुसार देण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेतील संवर्ग तीन-चार व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सध्या सुरू आहे ही प्रक्रिया तात्काळ यामुळे थांबणार आहे.
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या देखील पोर्टल द्वारे प्रस्तावित आहे या बदल्या करण्यासाठी या अगोदर निर्गमित शासन निर्णयानुसार 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
या बदल्या देखील आता होतील की नाही हे अनिश्चित आहे.
मुख्यमंत्र्यांच्या परवानगी ने एखादी बदली करता येणार आहे त्यामुळे शिक्षक संवर्गातील सर्वसाधारण बदल्या देखील बहुतेक होणार नाही असे या शासन निर्णयानुसार स्पष्ट होते.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
2 Comments
शिक्षक बदली पण रद्द का?
ReplyDeleteतसेही अजून शिक्षक बदली पोर्टल रण झाले नाही 30 जून पर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन 30 जूननंतर बदल्या होऊ शकतात
Delete