बदली अधिनियमानुसार बदली ची कार्यवाही करणेबाबत आजचा सामान्य प्रशासन विभागाचा शासन आदेश

 बदली अधिनियमानुसार बदली ची कार्यवाही करणेबाबत आजचा सामान्य प्रशासन विभागाचा शासन आदेश.

आज दिनांक 23 मे 2022 रोजी सामान्य प्रशासन विभागाने बदली अधिनियमानुसार बदलीची कार्यवाही करणेबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. यानुसार सन 2022 या चालू वर्षी बदली अधिनियमानुसार बदलीची कारवाई करण्यात यावी किंवा कसे याबाबत काही प्रशासकीय विभागाकडून विचारणा करण्यात येत असल्याने याबाबत पुढील प्रमाणे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार सन 2005 पासून प्रतिवर्षी बदली करण्यास सक्षम प्राधिकरणच्या मान्यतेने प्रशासकीय विभाग करा वरून एप्रिल व मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात. 

तथापि covid-19 या विषाणूमुळे उद्भवलेल्या महामार्गामुळे लागू झालेल्या टाळेबंदी च्या अपवादात्मक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 2020 च्या एप्रिल व मे महिन्यात तसेच 2021 एप्रिल व मे महिन्यात बदली अधिनियमातील तरतुदीनुसार सर्वसाधारण बदल्या न करण्याबाबतचे विविक्षित आदेश सामान्य प्रशासन विभागामार्फत निर्गमित करण्यात आले होते. थोडक्यात मागील केवळ दोन वर्ष अपवादात्मक परिस्थिती विचारात घेऊन सामान्य प्रशासन विभागाने बदली संदर्भात विविक्षित आदेश निर्गमित केले होते.

आता बदली अधिनियमानुसार प्रतिवर्ष ही बदली प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करणे अभिप्रेत आहे असे स्पष्टीकरण सामान्य प्रशासन विभागाने सदर शासन आदेशानुसार दिले आहे.

म्हणजेच या वर्षी बदली अधिनियम 2005 नुसार एप्रिल व मे महिन्यात सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्राधिकृत अधिकारी बदलीची प्रक्रिया राबवू शकतात किंवा राबवतील असे आजच्या शासन निर्णया नुसार स्पष्ट होते.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


 


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.