जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यासाठी सुधारित धोरण. शासन आदेश.
जिल्हा अंतर्गत बदल्या होण्याअगोदर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया होते. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी शासन निर्णय निर्गमित करुन जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी सुधारित दर निश्चित केले आहे. सदर शासन निर्णय पुढीलप्रमाणे.
जिल्हा बदली साठी किमान कार्यरत जिल्हा परिषद मधे 5 वर्ष सेवा पूर्ण असावी.
संवर्ग १ व २ म्हणजे दिव्यांग व्यक्ति अथवा पती पत्नी एकत्रीकरण असेल तर किमान सेवा ३ वर्ष असावी.
आंतरजिल्हा बदली हा हक्क असणार नाही जर रोस्टर नुसार जगा असेल व कार्यरत जिल्हा परिषद मधे १० % पेक्षा कमी जगा रिक्त असतील तर नियम व अटींच्या आधीन राहून बदली करण्यात एईल.
मूळ जिल्हा परिषद मधे पदोन्नती झाली असेल तर स्वखुशीने पदावनत होऊन त्यानंतरच सहाय्यक शिक्षक म्हणून आंतरजिल्हा बदली होईल.
ज्या जिल्हा परिषदेचे रूपांतर विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांनी तपासून दिली नाही अशा जिल्हा परिषदेत फक्त साखळी पद्धतीने बदली होईल.
आंतरजिल्हा बदलीसाठी फक्त चार जिल्ह्यांचा जिल्हा परिषदांची निवड करता येईल म्हणजे फक्त चार जिल्हा परिषदांचे ऑप्शन मिळेल.
कार्यरत जिल्हा परिषदेमध्ये ज्या संवर्गातून नियुक्ती मिळाली आहे त्या संवर्गाचे पद बदली हवी असलेल्या जिल्हा परिषदेच्या क्रॉस तर नुसार रिक्त असेल तरच बदली केली जाईल.
आंतरजिल्हा बदली प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यास न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार बदली प्रक्रिया राबवली जाईल किंवा न्यायालयाच्या निर्णय प्रतिक्षेत असल्यास न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून बदली प्रक्रिया राबवली जाईल.
नवीन धोरणानुसार आता संबंधित जिल्हा परिषदांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असणार नाहीत.
जिल्हा परिषद शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर रुजू झालेल्या नवीन जिल्हा परिषद मधील रुजू दिनांकापासून ग्राह्य धरली जाईल.
संबंधित शिक्षकांविरुद्ध विभागीय चौकशी ग्रस्त मित्रत्वाचा चालू असल्यास सदर कर्मचारी आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र समजण्यात येईल.
सर्व गोष्टींची पूर्तता असल्यास सर्व जिल्हा परिषदांमधील इच्छुक शिक्षकांची राज्यस्तरावरून प्रवर्गनिहाय संगणक पद्धतीने प्राधान्यक्रमाने एकच श्री संत सेवा जेष्ठता सूची नुसार बदली करण्यात येईल.
आंतरजिल्हा बदलीसाठी तीन संवर्ग विचारात घेण्यात येईल
विशेष संवर्ग 1 ( दिव्यांग व्यक्ती व इतर)
विशेष संवर्ग 2 (पती-पत्नी एकत्रीकरण)
सर्वसाधारण संवर्ग 3
विशेष संवर्ग एक व दोन मध्ये कोणाकोणाचा समावेश होतो यासाठी सविस्तर शासन आदेश अभ्यासावा.
सर्वसाधारण संवर्ग मध्ये संवर्ग 1 व संवर्ग 2 मध्ये न मोडणाऱ्या सर्व शिक्षकांचा समावेश होतो.
वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments