प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी 2022 मधील उन्हाळी सुट्टी बाबत- शासन निर्णय

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी 

2022 मधील उन्हाळी सुट्टी बाबत

- शासन निर्णय. 


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 2022 मधील उन्हाळी सुट्टी बाबत संभ्रम आज दिनांक 11 एप्रिल 2020 रोजी अधिकृतरित्या शासन आदेश निर्गमित करुन दूर केला आहे. 

आजच्या या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दिनांक 2 मे दोन हजार बावीस पासून अधिकृत उन्हाळी सुट्या जाहीर केल्या आहेत. 

या उन्हाळी सुट्ट्या विदर्भ वगळता राज्यभरात 12 जून पर्यंत असणार आहेत तर विदर्भात विदर्भातील तापमान लक्षात घेता त्या 26 जून पर्यंत असणार आहे. 

शैक्षणिक सत्र दोन हजार बावीस तेवीस विदर्भ वगळता इतर राज्यात 13 जून 2022 पासून तर विदर्भात 27 जून 2022 पासून सुरू होणार आहे. 


वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


इयत्ता पहिली ते नववी चा निकाल लागणार 30 एप्रिल 2022 ला. 


वरील शासन निर्णयानुसार इयत्ता पहिली ते नववी चा निकाल हा 30 एप्रिल ला लावायचा आहे जर तू 30 एप्रिल नंतर लावला तर मात्र तो निकाल पालक व विद्यार्थ्यांना पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शाळेवर असणार आहे. 

गणेश उत्सव, दिवाळी, नवरात्र उत्सव, ख्रिसमस यासारख्या दीर्घ सुट्ट्या घेण्याचा अधिकार शिक्षणाधिकारी यांना. 

उन्हाळी सुटी वगळता इतर दीर्घ सुट्ट्या जिल्ह्यातील परिस्थितीनुसार घेण्याचा अधिकार सदर शासन निर्णय नुसार जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात आला आहे परंतु असे करत असताना एकूण सुट्ट्या 76 पेक्षा जास्त होणार नाही याची काळजी देखील शिक्षणाधिकारी यांना घ्यायची आहे. 


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.