शाळांना आता नियमित शिपाई न देता शिपाई अनुदान -
शासन आदेश/निर्णय.
(सेवानिवृत्तीनंतर पद व्यपगत)
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून शाळांवरील नियमित शिपायांचे पद व्यपगत केले आहे यानंतर शाळांना शाळेच्या पटसंख्येनुसार शिपाई अनुदान मिळेल असे देखील या शासन निर्णयात नमूद आहे.
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः व पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थ श्रेणी यासाठी आकृतीबंध करण्याबाबत शासन निर्णयात असे नमूद करण्यात आले आहे की आता सध्या जर शाळेत नियमित शिपाई कार्यरत असेल तर तो सेवा निवृत्त होईपर्यंत तेथे शिपाई कार्यरत राहील व सेवानिवृत्त झाल्यानंतर तेथील शिपायाचे पद व्यपगत होईल व पुन्हा नियमित शिपाई सदर शाळेत नियुक्त होणार नाही तर त्याऐवजी शाळांना पटसंख्येनुसार व शाळा ज्या क्षेत्रात मुडते त्या क्षेत्रानुसार शाळांना शिपाई अनुदान मंजूर करण्यात बाबत सविस्तर माहिती सदर शासन निर्णयात देण्यात आली आहे.
म्हणजेच आता शाळांमध्ये नवीन शिपायाची भरती न होता जर शाळेत शिपाई ई म्हणून काम करायचे असेल तर मानधन तत्त्वावर काम करावे लागेल कारण शासनाने दर महा शिपाई अनुदान देण्याचे ठरवले आहे.
हे शिपाई अनुदान वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे असल्यामुळे ग्रामीण भागातील शिपायाला सर्वात कमी मानधन मिळेल तर मुंबईसारख्या मेट्रो सिटी मधील शिपायांना सर्वाधिक मानधन मिळेल असे आपणास खालील शासन निर्णयातून लक्षात येते.
वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
जर या अगोदर शाळेत एक चतुर्थश्रेणी कर्मचारी कार्यरत असेल आणि शाळेची पटसंख्या 500 पेक्षा कमी असेल तर मुंबई व इतर मेट्रो सिटी मध्ये हे दर महा दहा हजार रुपये एवढे शिपाई अनुदान मिळेल इतर शहरी भागांसाठी ते 7500 एवढी असेल तर ग्रामीण भागासाठी फक्त 5000 एवढे मानधन शिपाई पदासाठी मिळेल.
शाळेची पटसंख्या पाचशे किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास मुंबईसारख्या मेट्रो सिटी मध्ये 20000 एवढे शिपाई अनुदान शाळांना अनुज्ञेय राहील तर इतर शहरी भागात 15000 एवढे शिपाई अनुदान मिळेल व ग्रामीण भागात हे अनुदान 10000 एवढे असेल.
जसजशी पटसंख्या वाढत जाईल या प्रमाणात शिपाई पदसंख्या देखील वाढत जाईल व मिळणारे अनुदान देखील त्या पटीत वाढेल असे शासन निर्णयात सविस्तर नमूद करण्यात आले आहे त्यासाठी आपण वरील शासन निर्णय डाऊनलोड करू शकता.
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments