मागील आठवड्यातील शिक्षण विभागाने घेतलेले
सर्व महत्त्वपूर्ण निर्णय - महाराष्ट्र राज्य.
माहे एप्रिल मधील दिनांक १८ ते २४ या आठवड्यात महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे ते पुढीलप्रमाणे.
१) जिल्हा नियोजन समिती कडून किमान 5% निधी शाळां साठी राखीव ठेवण्या संदर्भात मंत्री मंडळ निर्णय.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक विकासासाठी जिल्हा नियोजन समिती किमान पाच टक्के निधी राखीव ठेवणार यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने शिफारस केली आहे.
२) शिष्यवृत्ती परिक्षा अर्ज करण्यासाठी ३० एप्रिल २०२२ पर्यंत मुदतवाढ.
वर्ग पाचवी वर्ग आठवी साठी दरवर्षी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा यावर्षी जुलै दोन हजार बावीस रोजी होणार असून त्यासाठी दुसऱ्यांदा ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत वाढ देण्यात आली आहे.
३) पहिले पाऊल मिळाव यांची दमदार सुरुवात झाली असून येत्या सत्रात जून 2022 मध्ये शाळेत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांनी आनंदाने तयारीनिशी शाळेत यावे यासाठी राज्य शासन पहिले पाऊल शाळा पूर्वतयारी अभियान राबवित आहे या अंतर्गत दिनांक 18 ते 27 एप्रिल या कालावधीत राज्यभरातील शासकीय शाळांमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावे होत आहेत.
४) या शाळापूर्व तयारी ला उत्सवाचे स्वरूप आले आहे लोकसहभागामुळे शाळा पूर्वतयारी अभियाना ला उत्सवाचे स्वरूप आले आहे यामध्ये पारंपरिक वेशभूषा प्रभात फेरी दिंडी भजन कीर्तन लेझीम नृत्य इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून गावात विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. या अभियानाला जनता रूप देण्याचे शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षाताई गायकवाड यांनी आवाहन केले आहे.
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments