महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना मिळणार
सातव्या वेतन आयोगानुसार वाहतूक भत्ता.
महाराष्ट्र राज्यात राज्य शासनाने जरी सातवा वेतन आयोग 2019 मधेच लागू केला असला तरी महाराष्ट्र शासन राज्यातील कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता हा 31 मार्च 2022 पर्यंत सहाव्या वेतन आयोगा नुसारच देण्यात येत आहे.
सुधारित सातव्या वेतन आयोगानुसार दिला जाणारा वाहतूक भत्ता व इतर प्रमुख मागण्यांसह महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचारी संघटनांनी 23 व 24 मार्च 2022 रोजी संप पुकारला होता पुकारलेल्या संपल मागे घेण्यात यावा म्हणून उपमुख्यमंत्री व सचिव यांचे उपस्थितीत संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार काही मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या आहे व त्याचे फलित म्हणून.
राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस पासून महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतन स्तरा नुसार वाढीव वाहतूक भत्ता अदा करण्यात येणार आहे.
या अगोदर ज्या प्रमाणे वाहतूक करण्यासाठी वेगवेगळी क्षेत्र ठरवलेली आहे क्षेत्रानुसार देखील वाहतूक भत्त्यात फरक आहे.
प्रामुख्याने मुंबई व मुंबई सारख्या इतर शहरात वाहतूक भत्ता सर्वाधिक दिला जातो व ग्रामीण भागात काम करणारे कर्मचारी सर्वात कमी वाहतूक भत्ता मिळतो.
एस 20 व त्यावरील pay level मधील काम मुंबईत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 5400 एवढा वाहतूक भत्ता मिळणार आहे तर मुंबई व्यतिरिक्त इतर ग्रामीण भागात काम करणारे कर्मचाऱ्यांना 2700 रुपये एवढा वाहतूक भत्ता मिळणार आहे. या स्तरांमध्ये सर्व अधिकारी वर्गाचा समावेश होतो.
तर एस 7 ते एस 19 यश स्तरातील मुंबई व इतर मेट्रो सिटी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुपये 2700 एवढा वाहतूक भत्ता तर इतर ग्रामीण भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुपये 1350 एवढा वाहतूक भत्ता अदा करण्यात येणार आहे. या स्तरांमध्ये सर्व तृतीय श्रेणी कर्मचारी यांचा समावेश होतो.
तर एक ते सहा या स्तरातील वेतन श्रेणी वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबई व इतर मेट्रो सिटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1000 रुपये व इतर ग्रामीण भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 675 रुपये एवढा वाहतूक भत्ता मिळणार आहे.
अंध/अस्थिव्यंग/दिव्यांग कर्मचाऱ्यांना या अगोदर दिल्या जाणाऱ्या वाहनभत्ता प्रमाणेच यावेळी देखील जास्त वाहतूक भत्ता देण्यात येणार आहे हे तो सर्वाधिक 10800 तर कमीत कमी 2250 एवढा असणार आहे. वरील पत्रात आपण सदरचे विवरण पाहू शकता.
सदरचा वाहनभत्ता सातव्या वेतन आयोगा सोबतच देणे अपेक्षित होता परंतु उशिरा का होईना तो एक एप्रिल दोन हजार बावीस पासून सर्व शासकीय निमशासकीय पात्र कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेला आहे.
कर्मचाऱ्यांसाठी अशाच महत्त्वाच्या अपडेट साठी नियमित भेट द्या आमच्या pradipjadhao.com या ब्लॉग ला आपल्याला नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपण आम्हाला वेगवेगळ्या सोशल साइट्सवर देखील फोलो करू शकता त्या सर्वात शेवटी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पुढील व्हाट्सअप ग्रुप वर देखील आपण जॉईन होऊ शकता.
Thank you🙏
0 Comments