निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी
शाळेच्या दर्शनी भागात असाव्या ह्या सहा गोष्टी
- सहसंचालकांचे आदेश
राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1098 दर्शनी भागावर लिहून ठेवावा या संदर्भाचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे चे सहसंचालक यांचे दिनांक एक तेरा एप्रिल दोन हजार बावीस रोजीचे परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप समतामूलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आले आहे आहे यास अनुसरून पुढील सहा बाबी शाळांनी दर्शनी भागावर लिहून ठेवाव्यात.
१) निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1098.
२) सती सावित्री समिती मधील शाळेतील समिती सदस्य यांची माहिती नाव व भ्रमणध्वनी क्रमांक.
३) शाळांच्या हद्दीतील पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले पोलीस काका/पोलीस दिली त्यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक.
४) Drop Box (POSCO) विषयी माहिती.
५) Chirag App बद्दल माहिती.
६)प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी यांचे निवारण करण्यासाठी तक्रार पेटी.
वरील सहा गोष्टी याविषयी सूचना फलक विद्यार्थ्यांना सहज दिशेला दर्शनी भागावर लिहून ठेवणे बाबत तसेच सखी सावित्री समितीचे गठन प्रत्येक शाळेत करून मासिक बैठकीतून या सर्वांचा आढाव घेतला जावा.
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी साठी खालील Download वर क्लिक करा.
दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा
Thank you🙏
0 Comments